मावळ ऑनलाईन –तळेगाव दाभाडे येथील म्हाडा कॉलनी, मनोहर नगर येथे ८ ऑक्टोबर २०२५ रोजी (Talegaon Dabhade)रात्री ११ वाजता झालेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. फिर्यादीच्या घरात घुसून शेजाऱ्यांनी मारहाण केली आणि गंभीर दुखापत घडवून आणली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकरणी श्रीमती कलावती शिवाजी सावंत (वय ३७, रा. म्हाडा कॉलनी, मनोहर नगर, तळेगाव दाभाडे, मुळगाव लातूर) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून ज्ञानेश्वर साठे (४५), आशिष साठे (२२), आदित्य साठे (२०) आणि विक्रम गवाळ (४०, सर्व रा. म्हाडा कॉलनी, मनोहर नगर, तळेगाव दाभाडे) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Prashant Bhagwat: प्रशांत दादा भागवत युवा मंचच्या वतीने जांभूळ येथे महिलांसाठी खास पर्व – “मनोरंजन संध्या २०२५” उत्साहात !
Pune : राजगडावर मधमाश्यांचा हल्ला; घाबरलेली तरुणी दरीत कोसळली
तक्रारीनुसार, फिर्यादी हे आपल्या राहत्या घरी जेवत असताना आरोपींनी संगनमत करून घरात प्रवेश केला. त्यांनी फिर्यादींच्या पतीला शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी आरोपी आशिष साठे याने दरवाज्याजवळील वीट उचलून ती फिर्यादींच्या पतीच्या तोंडावर मारली, ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. फिर्यादी हे भांडण सोडविण्यासाठी पुढे गेल्यावर त्यांनाही आरोपींनी ढकलून त्रास दिला.