पीसीयू मध्ये ‘इन्स्पिरा’ मालिकेतून विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट यशासाठी मार्गदर्शन
मावळ ऑनलाईन – कार्पोरेट क्षेत्राच्या बदलणाऱ्या व नेहमी वाढत( PCU) जाणाऱ्या अपेक्षा नव पदवीधरांनी आत्मसात केल्या पाहिजेत. पहिली नोकरी निवडताना आजचा काळ डिजिटलायझेशनचा आहे हे लक्षात घ्यावे. वेळोवेळी येणाऱ्या अडथळ्यांवर मात करून, जबाबदारी घेऊन समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता सिद्ध करावी लागेल. त्यासाठी तुमच्या मध्ये सहशीलता, स्वभावात लवचिकता हवी आणि समर्पण भावनेने काम करणे आवश्यक आहे. तरच तुमच्या व्यावसायिक आकांक्षा या नोकरी मधून पूर्ण होतील, असे मार्गदर्शन पंतप्रधान कार्यालयाचे माजी अर्थ सल्लागार व जागतिक अर्थतज्ञ डॉ. प्रसाद प्रधान यांनी केले.
Dehu Road Accident : मोटारसायकल अपघातात आई-वडील व मुलगा जखमी
बुधवारी (दि.८) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) साते वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठात (पीसीयू) उद्योग – विद्यापीठ संवाद केंद्राच्या माध्यमातून “पीसीयू इन्स्पिरा” या इंडस्ट्री लीडर लेक्चर सिरीज अंतर्गत “जनरल अवेअरनेस ऑन कॉर्पोरेट रिक्वायरमेंट फ्रॉम फ्रेशर्स – कॅम्पस टू करिअर” या विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले ( PCU)होते.
यावेळी पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, कुलगुरू डॉ. गोविंद कुलकर्णी, प्र उपकुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, औद्योगिक संबंध संचालक डॉ. प्रणव चरखा, मार्केटिंग हेड व समन्वयक जमीर मुल्ला, स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे विभाग प्रमुख डॉ. अमित पाटील स्कूल ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन चे विभाग प्रमुख डॉ. कमलेश मेश्राम आदी उपस्थित होते.
डॉ. प्रसाद प्रधान यांनी सांगितले की, प्लेसमेंट प्रक्रियेतील काळात विद्यार्थ्यांना ताण तणाव येऊ शकतो. आत्मनिर्भर संकल्पनेचा अंगीकार केल्यास व योग्य मार्गदर्शन घेऊन दृढ निश्चयाने, अनुभव घेऊन उद्योजक होणे देखील शक्य आहे. सध्या ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (जीसीसी) धोरणानुसार परदेशी गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीच्या खूप नव्या संधी निर्माण होत आहेत. मुंबईत झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलचे मध्ये भारताची डिजिटल बँकिंग आणि वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक नेतृत्व क्षमता अधोरेखित झाली असल्याचे सांगितले. तसेच, औषधनिर्माण क्षेत्र आणि डेटा सायन्स या क्षेत्रांतील वाढत्या संधी विद्यार्थ्यांना पुरक ठरणाऱ्या आहेत. भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेने आणि औद्योगिक सामर्थ्याने तरुणांसाठी विपुल संधी निर्माण होत असल्याचा विश्वास डॉ. प्रधान यांनी ( PCU) व्यक्त केला.

स्वागत, प्रास्ताविक करताना डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले की, यांनी “पीसीयू इन्स्पिरा” उपक्रम हा उपक्रम विद्यार्थ्यांना उद्योगविश्वातील वास्तव परिस्थितीची ओळख करून देण्यासाठी आणि करिअर मधे सक्षम बनवण्यासाठी राबवला जातो. पीसीयू मध्ये विद्यार्थ्यांना व्यवहार्य शिक्षण, बिझनेस केस स्टडीज आणि नेतृत्व विकासाचे मार्गदर्शन देण्यात येते.
डॉ. प्रणव चरखा यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे व्यवस्थापन नेहमी उद्योगसंपृक्त शिक्षण पद्धती आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कटिबद्ध ( PCU) आहे.
सूत्रसंचालन अक्षता राजगौरव, आभार संगीता मुखर्जी यांनी मानले. कुलपती तथा पीसीईटीचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, कुलगुरू डॉ. गोविंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात ( PCU) आला.