मावळ ऑनलाईन – बराच काळ प्रलंबित असलेल्या लोणावळा आणि तळेगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठीची आरक्षण सोडत अखेर निश्चित ( Lonavala News ) झाली आहे. येत्या 6 ऑक्टोबर 2025 रोजी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद कार्यालयात ही सोडत निघणार असून, याबाबतचे परिपत्रक महाराष्ट्र नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी छापवाले यांनी प्रसिद्ध केले आहे.
Pune: कोजागरी पौर्णिमेनिमित्त “ग़ज़लियत” दिल की दास्ता चे सोमवारी आयोजन
या सोडतीत राज्यातील 247 नगरपरिषदा व 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चित होणार आहे. मावळ तालुक्यातील लोणावळा व तळेगाव नगरपरिषदांची मुदत 2021 साली संपली असून, तेव्हापासूनच दोन्ही ठिकाणचे इच्छुक उमेदवार तसेच नागरिक नगराध्यक्ष ( Lonavala News ) निवडणुकीकडे डोळे लावून बसलेले आहेत.
लोणावळा नगराध्यक्षपदासाठी गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक राजकारणात चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. अनेकांनी उघडपणे आपली भूमिका मांडत जनसंपर्क वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, त्यावर आवाज उठवणे, तसेच सण-उत्सवांतून जनतेशी संवाद साधणे या मार्गाने उमेदवारांनी आपली छाप पाडण्याचा प्रयत्न केला आहे. तर काही इच्छुक मात्र आपली उमेदवारी अद्याप गुप्त ठेवून आहेत. त्यामुळे आरक्षण सोडतीत लोणावळा आणि तळेगाव नगराध्यक्ष पद कोणत्या प्रवर्गासाठी निघते याकडे सर्वांचेच लक्ष लागले ( Lonavala News ) आहे.
Rashi Bhavishya 6 Oct 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
दरम्यान, या दोन्ही नगरपरिषदमध्ये नगराध्यक्ष पद खुले राहो वा आरक्षित, प्रमुख लढत मावळचे विद्यमान आमदार व माजी आमदार यांच्या गटांमध्येच रंगण्याची शक्यता आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी निश्चित करताना विधानसभा निवडणुकीतील घडामोडी, पक्षीय समीकरणे, तसेच संकटकाळात कोणाच्या पाठीशी उभे राहिले किंवा नाहीत यावर उमेदवारांची स्थिती अवलंबून राहील, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
येत्या काही दिवसांत आरक्षण सोडतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दोन्ही शहरांतील राजकीय समीकरणांना नव्या कलाटणीचा ताण मिळणार असून, निवडणूकपूर्व राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे स्पष्ट दिसत ( Lonavala News) आहेत.