मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग – शालिवाहन शके १९४७ विश्वावसुनाम संवत्सर महिना: अश्विन, शुक्लपक्ष. तिथी – १४.( १२.३४ पर्यंत). तारीख – ०६.१०.२०२५. वार – सोमवार. (Rashi Bhavishya 6 Oct 2025)
शुभाशुभ विचार – १२ पर्यंत चांगला.
आज विशेष- कोजागरी पौर्णिमा.
राहू काळ – संध्याकाळी ७.३० ते ९.००.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र- उत्तरा भाद्रपदा. चंद्र राशी – मीन.
मेष – ( शुभ रंग – डाळिंबी) Rashi Bhavishya 6 Oct 2025
राशीच्या व्यय स्थानातून भ्रमण करणारा चंद्र ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न वाढवायला सांगत आहे. वेळेचे योग्य नियोजन गरजेचे आहे. रात्रीच्या प्रवासात सावध राहावे लागेल.
वृषभ ( शुभ रंग- राखाडी)
खर्च कितीही वाढला तरी आज लाभातून भ्रमण करणारा चंद्र आर्थिक बाजू भक्कम ठेवणार आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्वाचा आदर केला जाईल.
मिथुन – ( शुभ रंग- पांढरा)
अति महत्त्वाकांक्षांना थोडा आवर घालून आज आपल्या तब्येतीची ही काळजी घेणे गरजेचे आहे. नोकरीत वरिष्ठ तुमच्या मागण्यांचा नक्की विचार करतील.
कर्क – ( शुभ रंग – भगवा)
कोणतीही गोष्ट सहज मिळणार नाही, तरी प्रयत्नांना दैव अनुकूल राहील. घरात थोरांचे मानपान सांभाळावे लागतील. ज्येष्ठांनी उपासनेत खंड पडून देऊ नका.
सिंह -( शुभ रंग – गुलाबी) Rashi Bhavishya 6 Oct 2025
आज राशीच्या अष्टमात चंद्र असल्याने वाहन चालवताना फक्त ड्रायव्हिंग वर लक्ष केंद्रित करा. कायद्याचे उल्लंघन किंवा कोणतेही गैरवर्तन महागात पडेल.
कन्या – ( शुभ रंग- जांभळा)
एखाद्या विषयावर चर्चा करताना समोरील व्यक्ती आपल्यापेक्षाही ज्ञानी असू शकते याचे भान असूद्या. आज तुम्ही कुठेही आपले मत मांडण्याची घाई करू नका. वाद विवाद टाळा.
तूळ ( शुभ रंग- पिस्ता)
कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटनांना तोंड द्यावे लागेल. ज्येष्ठांनी आरोग्य विषयक चाचण्या वेळीच करून घ्याव्यात. बरा झालेला एखादा आजार डोके वर काढेल.
वृश्चिक ( शुभ रंग – निळा)
उच्चशिक्षित असणाऱ्यांना लठ्ठपगाराच्या नोकरीच्या संधी चालून येतील. नवविवाहित दांपत्यांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल. छान दिवस.
Pune: ‘स्वरयज्ञ’ महोत्सवातून रसिकांना सांगीतिक भेट
धनु (शुभ रंग- मोरपंखी) Rashi Bhavishya 6 Oct 2025
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटणारी एखादी कामगिरी तुमच्या हातून होईल. कुटुंबीयांच्या वाढत्या मागण्या तुम्ही आनंदाने पुरवाल.
मकर (शुभ रंग- आकाशी)
विविध मार्गाने आलेला पैसा विविध मार्गाने जाईल. आज काही जण एखाद्या सामाजिक कार्यात लक्ष घालतील. तुमचा शेजाऱ्यांशी आपलेपणा वाढेल.
कुंभ – (शुभ रंग- लाल)
आज तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने मनस्थितीही उत्तम असेल. वाद विवाद टाळून व सुसंवाद साधून अनेक बिकट प्रश्न सोपे करू शकाल.
मीन ( शुभ रंग- मोतिया)
आज तुम्ही जरा हट्टीपणाने वागाल. इतरांशी जमवून घेणे अवघड जाईल. महत्त्वाच्या चर्चेत फक्त ऐकण्याचे काम कराल तर बरे. वादास आमंत्रण देऊ नका.
शुभम भवतु!
– जयंत कुळकर्णी
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424