मावळ ऑनलाईन –वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांना (Talegaon Dabhade Crime Newदोघांनी अरेरावी करत त्यांच्या शासकीय कामात अडथळा आणला. ही घटना रविवारी (१४ सप्टेंबर) रोजी दुपारी ३:४५ वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सोमाटणे फाटा शिरगाव रोडवर घडली.
Pune: पंडित रामदास पळसुले यांना स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार
या प्रकरणात पोलीस कर्मचारी प्रशांत खेडकर (४२, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओंकार अविनाश क्षिरसागर (२९, तळेगाव दाभाडे) आणि शुभम सावळेराम गावडे (२९, वराळे) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि इतर वाहतूक पोलीस कर्मचारी वाहतूक नियंत्रित करत असताना आरोपी ओंकार याने स्कुटी रस्त्यात उभी करून “तुम्हाला ट्राफिक काढता येत नाही का?” असे बोलून वाद घातला. त्याने “तुमच्याकडे कोणता आदेश आहे? मी तुमचा व्हिडिओ काढून सीपी साहेबांना पाठवून व्हायरल करतो” अशी धमकी दिली. त्याने पोलीस हवालदार बळीराम चव्हाण यांच्यासोबत धक्काबुक्की आणि मारहाण केली. आरोपी क्रमांक शुभम यानेही अरेरावीची भाषा वापरत त्यांना दमदाटी केली. तळेगाव दाभाडे पोलिस पुढील तपास करत (Talegaon Dabhade Crime News) आहेत.