मावळ ऑनलाईन – आयुध निर्मिती देहू रोड (O.F.D.R) फॅक्टरीचे (AYUSH manufacturing factory) निगमीकरण करण्याचा तसेच भविष्यात होणाऱ्या कामगारांच्या हस्तांतरण च्या Option Form चा विरोध करण्यासाठी आणि सेवानिवृत्तीपर्यंत सरकारी नोकर म्हणून अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी सर्व संघटना आणि असोसिएशन मिळून संयुक्त समितीची स्थापना करण्यात आली आहे.
Chakan News : अन्यायकारक कारवाईविरोधात चाकणमध्ये मोर्चा;शासन व प्रशासनाच्या विरोधात आगपाखड
मान्यता प्राप्त संघ आणि संरक्षण मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांच्या संघटना आणि अधिकाऱ्यांनच्या असोसिएशन (CDRA) यांच्याद्वारे दिलेल्या माहितीनुसार OFDR शाखेत OFWU (AIDEF), OFKU (INDWF), BSKS (BPMS), OFEU (NPDEF) यांसह अनेक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
संयुक्त कृती समितीने ओ.एफ.डी.आर कर्मचाऱ्यांच्या एकतेसाठी आणि त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी व्यापक पातळीवर जनजागृती उपक्रम सुरू केले आहेत. 9 सप्टेंबर रोजी पॅम्प्लेट्स वितरित करण्यात आले तर 10 सप्टेंबरला बैठक घेण्यात आली, ज्याला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Maval : मावळ पर्यटन तालुका घोषित होणार
समिती अंतर्गत पुढील कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत(AYUSH manufacturing factory)
11 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर 2025 दरम्यान हस्ताक्षर अभियान.
1 ऑक्टोबर 2025 रोजी ‘निगमीकरण विरोधी दिवस’ करण.
याशिवाय, प्रसार भारतीय मॉडेल लागू करण्याच्या मागणीसाठी पुढील काळात एकदिवसीय संप आयोजित करण्याची तयारी सुरू असल्याचे समितीकडून इशारा देण्यात आला आहे. संयुक्त कृती समितीने सर्व कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमांत सक्रीय सहभागी होण्यासाठी (AYUSH manufacturing factory) आवाहन केले आहे.