मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग महिना – भाद्रपद – कृष्णपक्ष. तिथी – ०१. शके १९४७. वार – सोमवार. तारीख – ०८.०९.२०२५. (Rashi Bhavishya 8 Sept 2025) शुभाशुभ विचार – ग्रहण कारिदिन.आज विशेष – प्रतिपदा श्राद्ध.राहू काळ – सकाळी ७.३० ते ०९.००.दिशा शूल – पूर्वेस असेल.आज नक्षत्र – पूर्वा भाद्रपदा २०.०३ पर्यंत नंतर उत्तराभाद्रपदा.चंद्र राशी – कुंभ १४.२९ पर्यंत नंतर मीन.
—————————-
मेष- (शुभ रंग- निळा) Rashi Bhavishya 8 Sept 2025
आज विदेशाशी संबंधित असलेले व्यवसाय चांगले चालतील बेरोजगारांना घरापासून दूर चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. आज दिवस खर्चाचा आहे.
वृषभ (शुभ रंग- मोरपंखी)
आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. काही भाग्यवंतांना आज नव्या घराचा ताबा मिळू शकेल. नवीन व्यावसायिकांना कर्ज मंजुरी होऊ शकेल.
मिथुन (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
मोठ्या लोकांमधील असलेल्या तुमच्या ओळखी व्यवसाय वृद्धीच्या कामी येतील. अधिकारी वर्गाला वाढत्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागणार आहेत.
कर्क ( शुभ रंग- जांभळा)
आज जेष्ठ मंडळींचा देवधर्माकडे कर असेल. गृहिणी यथा शक्ती दानधर्म करतील. आजी-आजोबा नातवंडात रमतील. संध्याकाळी तुमची पावले सत्संगाकडे वळतील.
सिंह ( शुभ रंग- आकाशी) Rashi Bhavishya 8 Sept 2025
नोकरीच्या ठिकाणी काही मनाविरुद्ध घटना घडतील. आज फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. कुसंगत टाळून सज्जनांच्या सहवासात राहणे हिताचे राहील.
कन्या (शुभ रंग- पांढरा)
महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना पार्टनर ना विश्वासात घेणे हिताचे राहील. घरगुती निर्णय घेताना मात्र जोडीदाराचे मत अवश्य घ्या. अति आक्रमकता टाळा.
तूळ (शुभ रंग- सोनेरी)
राशीच्या षष्ठ स्थानातून चंद्रभ्रमण होत असताना विरोधकांचा जोर वाढलेला जाणवेल. तब्येतीची ही काळजी घेणे गरजेचे राहील. येणी वसूल होणार आहेत.
वृश्चिक ( शुभ रंग- चंदेरी)
चैनी व विलास ही वृत्ती वाढणार आहे. आवडत्या छंदासाठी आवर्जून वेळ काढाल. काही रसिक मंडळी सहलीचे बेत आखतील. प्रकृती आज तुम्हाला उत्तम साथ देईल.
धनु (शुभ रंग- भगवा) Rashi Bhavishya 8 Sept 2025
प्रॉपर्टी खरेदी विक्री विषयी व्यवहार तुमच्या अपेक्षेनुसार होतील. घरात प्रिय पाहुण्यांची उठबस राहील. मुलांच्या शिस्तीकडेही लक्ष देणे हिताचे राहील.
मकर (शुभ रंग- गुलाबी)
राशीच्या तृतीय स्थानी जाणारा चंद्र तुमच्या पराक्रमात वृद्धी करणार आहे. आज फक्त रिकामटेकड्या चर्चा टाळा कारण त्यातून वादच होतील.
कुंभ ( शुभ रंग- राखाडी)
खिशात पैसा खेळता असल्याने तुम्हाला प्रत्येक कामात उत्साह जाणवेल. रखडलेले उपक्रम सुरू करता येतील. इतरांना दिलेले शब्द पाळू शकाल.
मीन ( शुभ रंग – पिस्ता)
आज वाढत्या खर्चात आवकही पुरेशी असेल त्यामुळे जमा खर्चाचा तराजू समतोल राहील. तुमच्या अति स्पष्ट वक्तेपणामुळे काही नाती दुरावतील.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424