मावळ ऑनलाईन – वडगाव शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक (Ganesh immersion procession)मंगळवार (दि.२) रोजी मोठ्या भक्तीभावात, शिस्तबद्ध वातावरणात आणि उत्साहात पार पडली. घरगुती गौरी-गणपती बाप्पांचे विसर्जनही भक्तिमय वातावरणात करण्यात आले. ग्रामदैवत पोटोबा महाराज देवस्थान मानाचा पहिला गणपती आणि जय बजरंग तालीम मानाचा पहिला गणपती यांच्या विसर्जनापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर शहरातील सर्व गणेश मंडळांनी आपल्या गणरायाला ढोल-ताशांच्या गजरात, भक्तीगीतांच्या स्वरात आणि जोशपूर्ण जल्लोषात निरोप दिला.
Accident : मोटारसायकलच्या धडकेत एकाचा मृत्यू
मिरवणुकीत विविध गणेश मंडळांनी आकर्षक झांकी, सांस्कृतिक सादरीकरणे.(Ganesh immersion procession) आणि पारंपरिक वाद्यांचा गजर करून वातावरण उत्साहवर्धक केले. जय जवान जय किसान मित्र मंडळाच्या ‘शिव तांडव’ या देखाव्याने नागरिकांना मंत्रमुग्ध केले, तर सिद्धिविनायक मित्र मंडळाने मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भातील सजावट करून सामाजिक भान जागृत केले. या दोन्ही झांक्यांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
Pune: पुणे महापालिका निवडणूक प्रभाग रचनेवर तब्बल 5 हजार 843 हरकती, सोमवारपासून होणार सुनावणी
याव्यतिरिक्त, सर्वच मंडळांनी आपल्या गणेशमूर्तींच्या(Ganesh immersion procession) सजावटीत आकर्षक रोषणाई,फुलांच्या आरास, तसेच देखाव्यांमधून सामाजिक व सांस्कृतिक संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. या सुंदर सजावटीमुळे संपूर्ण मिरवणूक दिमाखदार व रंगतदार ठरली.
मिरवणुकीच्या मार्गावर सर्वत्र रोषणाई,फुलांची सजावट व स्वागतद्वार उभारण्यात आले होते. ठिकठिकाणी विविध संघटनांनी स्वागत कक्ष उभारले होते.मोरया प्रतिष्ठान, वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस, विश्व हिंदू परिषद,भारतीय जनता पार्टी,बजरंग दल,महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच .(Ganesh immersion procession)वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या वतीने भाविकांचे स्वागत करण्यात आले. तर गजानन मित्र मंडळ यांच्या वतीने वृक्ष वाटप करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. अशादीप कॉम्प्युटर यांच्या वतीने मिरवणुकीत सहभागी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.

मिरवणुकीच्या मार्गावर सर्वत्र रोषणाई,फुलांची सजावट व स्वागतद्वार .(Ganesh immersion procession)उभारण्यात आले होते. ठिकठिकाणी विविध संघटनांनी स्वागत कक्ष उभारले होते.मोरया प्रतिष्ठान, वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस, विश्व हिंदू परिषद,भारतीय जनता पार्टी,बजरंग दल,महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या वतीने भाविकांचे स्वागत करण्यात आले. तर गजानन मित्र मंडळ यांच्या वतीने वृक्ष वाटप करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. अशादीप कॉम्प्युटर यांच्या वतीने मिरवणुकीत सहभागी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.

महिला,युवक,लहान मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला. ढोल-ताशांच्या गजरात “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या घोषणांनी वडगाव शहर (Ganesh immersion procession)दुमदुमून गेले.

गणेश विसर्जन मिरवणुकीत कोणताही अप्रिय प्रकार घडू नये यासाठी वडगाव पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरभर पोलीस कर्मचारी, वाहतूक पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने व्यवस्था केली. वडगाव नगरपंचायत व महावितरणने मिरवणुकीदरम्यान सुरळीत वीजपुरवठा व स्वच्छतेची व्यवस्था केली.
शहरातील नागरिक, मंडळांचे कार्यकर्ते,सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे वडगाव गणेश विसर्जन मिरवणूक यशस्वीरीत्या व शांततेत पार Ganesh immersion procession) पडली.