मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – भाद्रपद – शुक्लपक्ष. तिथी – ३. शके १९४७. वार – मंगळवार. तारीख – २६.०८.२०२५. (Rashi Bhavishya 26 August 2025)
शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
आज विशेष – हरतालिका तृतीया.
राहू काळ – दुपारी ०३.०० ते ०४.३०.
दिशा शूल – उत्तरेला असेल.
आज नक्षत्र – हस्त. चंद्र राशी – कन्या.
मेष- (शुभ रंग- राखाडी) Rashi Bhavishya 26 August 2025
आज जे काही कराल ते तब्येतीला जपून करा. आज क्षुल्लक वाटणारी दुखणी ही दुर्लक्षित करू नका. तज्ञ डॉक्टरांचा सल्ला वेळीच घेतलेला बरा राहील.
वृषभ (शुभ रंग- पिस्ता)
स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्याल उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे धोरण असेल. उच्चशिक्षित तरुण तरुणी ध्येयप्राप्तीचा आनंद घेतील.
मिथुन (शुभ रंग – मरून)
पारिवारिक सदस्यांमध्ये सामंजस्याची भावना असेल. मुलांची अभ्यासातील गोडी वाढेल. आज गृहसौख्याचा दिवस, आईला दिलेला शब्द जरूर पाळा.
कर्क ( शुभ रंग- डाळिंबी)
राशीच्या तृतीय स्थानात भ्रमण करणारा चंद्र तुमच्या पराक्रमात वृद्धी करणार आहे. आज तुम्ही चर्चेपेक्षा कृतीला प्राधान्य द्याल. भावंडांशी सलोखा वाढेल.
Lonavala Crime News : कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या तरुणाला लोणावळा पोलिसांकडून सातारा येथून अटक
सिंह ( शुभ रंग- मोरपंखी) Rashi Bhavishya 26 August 2025
अत्यंत उत्साहाने दिवसाची सुरुवात कराल. आज आर्थिक बाजू भक्कम असल्याने मनोबल उत्तम राहील. व्यवसायात काही पेच प्रसंगांना धैर्याने तोंड द्याल.
कन्या (शुभ रंग- जांभळा)
आज तुम्ही एखादा विवाह जुळवण्यात यशस्वी मध्यस्थी कराल. महत्त्वाच्या चर्चेत आपले मत ठामपणे मांडाल. आज घाईघाईत घेतलेले निर्णय चुकतील.
तूळ (शुभ रंग- गुलाबी)
भविष्यकाळाच्या दृष्टीने एखादी गुंतवणूक करण्याचा तुमचा विचार राहील. ज्येष्ठ मंडळी तीर्थयात्रा करतील. घरातील थोर मंडळी आपलंच खरं करतील.
वृश्चिक ( शुभ रंग- निळा)
तुम्ही पूर्वी केलेली एखादी गुंतवणूक चांगला लाभ मिळवून देईल. कार्यक्षेत्रात तुम्ही केलेले कष्ट कारणी लागतील. प्रमोशनचा मार्ग सोपा होईल. छान दिवस आहे.

Loudspeaker Permission:गणेशोत्सवात रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक वापरासाठी सात दिवस परवानगी
धनु (शुभ रंग- चंदेरी) Rashi Bhavishya 26 August 2025
योग्य आर्थिक नियोजन करून व केवळ चर्चेपेक्षा कृतीला प्राधान्य देऊन कार्यक्षेत्रात स्पर्धेला यशस्वीपणे तोंड देता येईल. आज मित्र चुकीचा मार्ग दाखवतील.
मकर (शुभ रंग- पांढरा)
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी दिलेली आश्वासने फारच मनावर घेण्याची गरज नाही. आज संध्याकाळी तुम्ही सत्संगाची वाट धरणेच हिताचे राहील.
कुंभ ( शुभ रंग- सोनेरी)
नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांचे समाधान होणे कठीण आहे. आज गोडबोल्या मंडळींपासून दूरच रहा. विश्वासातली व्यक्तीच विश्वासघात करू शकेल. प्रलोभने टाळा.
मीन ( शुभ रंग – भगवा)
आज वैवाहिक जोडीदाराशी चांगले सूर जुळतील. धंद्यात भागीदारांबरोबर एकमत राहील. मोठे व्यावसायिक करार यशस्वी होतील. सकारात्मकता वाढेल.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424