मावळ ऑनलाईन – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ( Maval News) तळेगाव शाखेच्यावतीने या वर्षी जगप्रसिद्ध वग सम्राट दादू इंदुरीकर यांच्या जन्म शताब्दी वर्षाचे औचित्य साधून मावळ विभागात प्रथमच वग सम्राट दादू इंदुरीकर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
मावळ परिसरातील सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव शाखेला २० वर्षे पूर्ण झाली. आज पर्यंत तळेगाव शाखेच्या विविध कार्यक्रमांना नेहमीच दिग्गज व प्रथित यश नाट्य सिने कलावंतानी आणि रसिकांचा उत्स्फुर्त पाठींबा मिळाला आहे .
Mockdrill : आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे मॉकड्रील
या वर्षी जगप्रसिद्ध वग सम्राट दादू इंदुरीकर यांच्या जन्म शताब्दी वर्षाचे औचित्य साधून मावळ विभागात प्रथमच वग सम्राट दादू इंदुरीकर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा मराठी भाषेत होणार असून महाराष्ट्र राज्यातील सर्व हौशी नाट्यसंस्था ,महाविद्यालये,औद्योगिक किंवा कार्यालयीन संघ यांच्या साठी खुली असणार आहे. ( Maval News) या वर्षी जगप्रसिद्ध वग सम्राट दादू इंदुरीकर यांच्या जन्म शताब्दी वर्षाचे औचित्य साधून मावळ विभागात प्रथमच वग सम्राट दादू इंदुरीकर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा मराठी भाषेत होणार असून महाराष्ट्र राज्यातील सर्व हौशी नाट्यसंस्था ,महाविद्यालये,औद्योगिक किंवा कार्यालयीन संघ यांच्या साठी खुली असणार आहे.
Dehuroad Crime News : हॉटेलचे बिल देण्यावरून झालेल्या वादातून मित्राचा खून
सादर स्पर्धा दि.९, १०, ११ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत कै.डॉ.शं.वा. परांजपे नाट्यसंकुल,कलापिनी सांस्कृतिक केंद्र,तळेगाव दाभाडे,पुणे ४१०५०७ येथ होणार आहेत.प्रथम येणाऱ्या २५ प्रवेशिकाच स्पर्धेसाठी पात्र होतील.प्रवेश अर्ज नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेच्या संकेत स्थळावर १० सप्टेंबर २०२५ पासून मिळू शकतील.प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख – २० सप्टेंबर २०२५ आहे.
या स्पर्धांसाठी सांघिक प्रथम रु.५१,०००/- रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, सांघिक द्वितीय रु.३५,०००/- रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, सांघिक तृतीय रु.२५,०००/- रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र व इतर आकर्षक २० रोख पारितोषिके ठेवण्यात आली ( Maval News)आहेत.
या स्पर्धेच्या लोगो चे अनावरण रविवार दि.२४ ऑगस्ट २०२५ रोजी मावळचे तरुण तडफदार कार्य तत्पर आमदार सुनील शेळके,मावळचे खासदार श्रीरंग बारणे व सुप्रसिद्ध सिने नाट्य अभिनेते राजन भिसे यांच्या उपस्थितीत नाना भालेराव कॉलनी, तळेगाव स्टेशन येथे सायंकाळी ७ वाजता करण्यात येणार आहे .
तर पारितोषिक वितरण समारंभ १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता कै.डॉ.शं.वा. परांजपे नाट्यसंकुल,कलापिनी सांस्कृतिक केंद्र,तळेगाव दाभाडे,पुणे ४१०५०७ येथे होणार आहे.पारितोषिक वितरणा आधी स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या विजेत्या एकांकिकेचे (Maval News) प्रयोग सादर होणार आहेत.