मावळ ऑनलाईन –पवन मावळ परिसरातील ठाकूरसाई गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर निर्जन स्थळी एका आदिवासी महिलेला शेताच्या बांधावर(Maval Crime News) नेऊन तिच्यावर अत्याचार केला. दारूच्या नशेत आलेला आरोपी अत्याचार केल्यानंतर पळून गेला. कुठलाही पुरावा नसताना परफेक्ट स्केच आणि खबऱ्यांच्या माहितीच्या आधारे लोणावळा ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला अटक केली.
बाळू दत्तू शिर्के (जवण नंबर एक, मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने २६ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Chikhali Residents : चिखली घरकुलवासीयांची घरपट्टी माफ करा!
Talegaon Dabhade: रोटरी सिटी आयोजित शौर्य गौरव पुरस्कार समारंभ संपन्न!
पवनानगर येथून ठाकूरसाई गावाकडे जाणाऱ्या रस्त्याने ३३ वर्षीय आदिवासी कातकरी महिला १५ जुलै रोजी रस्त्याने चालत जात होती. त्या दिवशी मुसळधार पाऊस सुरु होता. दुपारी दोन वाजताच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीने महिलेचा दुचाकीवरून पाठलाग केला. निर्जन ठिकाणी महिलेला अडवले आणि बाजूच्या शेताच्या बांधाच्या आडोशाला ओढत नेले. तिथे महिलेवर त्याने अत्याचार केला. महिलेने जिवाच्या आकांताने ओरडून आरोपीच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र ती सुरु शकली नाही. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून पळून गेला. पोलिसांनी पथके तयार करून आरोपीच्या मागावर रवाना केली. आरोपीला २४ तासांच्या आत अटक करण्यात आली. आरोपीला २६ जुलै पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.