मावळ ऑनलाईन –शिरगाव पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यात गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने अवघ्या ८ दिवसांत चार अट्टल चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल २५.३२ लाख रुपये किंमतीचे ३५.६ तोळे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली अल्टो कार जप्त केली आहे.
यशोदास राठोड, रितेश राठोड, आकाश मैनावत, ऋतिक मैनावत अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अभिषेक नानावत हा फरार आहे.
Amit Gorkhe: “राज्य शासनातील अधिकारी-पदावरील खेळाडूंना सन्मान द्या” – आमदार अमित गोरखे यांची विधान परिषदेत उच्चस्तरीय बैठकीची मागणी
Dehugaon: तब्बल १७ वर्षांनंतर तुकोबांची पालखी आळंदी मार्गे देहूत परतणार
शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी झाल्याची घटना १ जुलै रोजी उघडकीस आली. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट पाच कडून करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळ ते लोणावळा दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्यात एक अल्टो कार वापरण्यात आली असल्याची माहिती मिळवली. त्यानंतर आरोपींची ओळख पटवून त्यातील चौघांना साईनगर येथील जंगलातून अटक करण्यात आली. आरोपींकडून दागिन्यांची १०० टक्के रिकव्हरी करण्यात आली. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.