मावळ ऑनलाईन –जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी १७ वर्षांनंतर आळंदी मार्गे देहूला परतणार असल्याची माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.
श्री संत तुकाराम महाराजांची पालखी श्री क्षेत्र देहूगाव येथे आपला ३५ दिवसांचा प्रवास संपवून पुन्हा देहू नगरीत २१ जुलैला येणार आहे. यंदा श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे ३४० वे वर्ष व संत ज्ञानेश्वर महाराजांचे ७५० वे जयंती वर्ष व श्री संत तुकाराम महाराजांचे ३७५ वे वैंकुठगमण वर्षाचा दुग्धशर्करा योग असल्याने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानने ११ जुलै २०२५ रोजी श्री संत तुकाराम महाराज संस्थानला आपण २० जुलै २०२२५ रोजी आळंदी येथे पालखी मुक्कामी आणावी असे निमंत्रण दिले होते.
Alandi:आळंदी ग्रामीण भागामध्ये बिबट निवारण केंद्र टीमची पाहणी:स्थानिक नागरिकांना मार्गदर्शन
Lonvala : सडक्या, उंदरांनी कुरतडलेल्या बटाट्यांचा वापर करून बनवले जातात वडे ,लोणावळ्यातील धक्कादायक प्रकार
याचा स्विकार करून श्री संत तुकाराम महाराज संस्थानने २० जुलैला आपला आळंदी मुक्काम निश्चित केला आहे. यासाठी पालखी सोहळा प्रमुखांनी पुण्यातील एक मुक्काम कमी करून १९ जुलैला पालखी नेहमीच्या मार्गाने पिंपरीगांव येथे विठ्ठल मंदिरात मुक्कामी येणार असून २० जुलैवा पालखी सकाळी भोसरी मार्गे आळंदीकडे मार्गस्थ होईल.
२० जुलैला तारखेलाचा मुक्काम करून पालखी डुडुळगाव, मोशी, टाळगाव चिखली, तळवडे, विठ्ठलनगर मार्गे देहूत २१ जुलैला दुपारी २ वाजता दाखल होईल.
यापुर्वी २००८ मध्ये असाच श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आळंदी मार्गे देहूला आला होता. त्यावेळी पालखीचे चिखली टाळगाव परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केले होते. यंदाही याची पुर्नरावृत्ती होणार असल्याने देहू आळंदी मार्गावरील डुडुळगाव मोशी, चिखली, तळवडे या गावातील भाविकांमध्ये व नागरिकांमध्ये मोठा उत्साह भरला आहे. हे करताना पालखीचे पारंपारिक पध्दतीने स्वागत करण्यात यावे असे अवाहन श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, विश्वस्थ विक्रमसिंह महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे यांनी केले आहे.