situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon Dabhade : तंत्रज्ञान व जाहिरातीच्या युगात गुरुकुल पद्धतीने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल- संतोष खांडगे

Published On:
Talegaon Dabhade

मावळ ऑनलाईन – तंत्रज्ञान व जाहिरातीच्या युगात गुरुकुल पद्धतीने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल ,असे संतोष खांडगे यांनी (Talegaon Dabhade) आज सांगितले. तळेगाव दाभाडे येथील ॲड पु वा परांजपे विद्या मंदिरामध्ये गुरुकुल पद्धतीने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या विशेष शैक्षणिक उपक्रमाची आज सुरुवात करण्यात आली होते.

Dehu Road Railway Station : देहूरोड रेल्वे स्थानकावर सह्याद्री एक्सप्रेस सुरू करण्यासाठी प्रवासी संघाच्या अध्यक्षांचा आत्मदहनाचा प्रयत्न

पुढे बोलताना खांडगे म्हणाले की,तंत्रज्ञान व जाहिरातीच्या युगात (Talegaon Dabhade) पंचक्रोशीतील मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाची सुवर्णसंधी या गुरुकुल अध्ययन प्रणालीद्वारे उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. पालकांनी आपल्या पाल्याच्या विकासासाठी शाळेला सहकार्य करावे.
यावेळी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष दत्तात्रय खांडगे, पैसाफंड प्राथमिक शाळा तळेगाव दाभाडे शालेय समिती अध्यक्ष विनायक अभ्यंकर विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे पर्यवेक्षिका रेखा भेगडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Vadgaon BJP : वडगांव मावळमधील बाह्यवळण रस्त्यावर तातडीने भुयारी मार्ग किंवा उड्डाणपुल उभारण्याची वडगाव भाजपाची मागणी

या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक ,बौद्धिक व नैतिक विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून कृती कार्यक्रम (Talegaon Dabhade) राबविण्यात येणार आहे. बालवयातच विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास व्हावा यासाठी योग व मेडिटेशन सत्र , सूर्यनमस्कारातून शारीरिक क्षमता वर्धन व आरोग्य समृद्धता मिळावी .संभाषण कौशल्य वृद्धीसाठी स्पोकन इंग्लिश वर्ग आणि स्पर्धा परीक्षा द्वारे विद्यार्थ्यांना आपले भविष्य सुरक्षित करता यावे ; यासाठी शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून इयत्ता पाचवी व आठवीच्या वर्गांसाठी शिष्यवृत्ती वर्ग, समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षा तयारी वर्ग, या समवेत अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी मार्गदर्शन वर्ग व सराव पाठ घेतले जाणार आहेत.

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जीवनातील पहिली पायरी शालांत प्रमाणपत्र परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण करता यावी, उत्तम असे यश संपादन करता यावे यासाठी गटकार्य ,सराववर्ग विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले ( Talegaon Dabhade) आहे.

शिक्षणा क्षेत्राचा केंद्रबिंदू असणाऱ्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विद्यालयाने सुरू केलेला, हा एक दीर्घकालीन उपक्रम आहे. अध्यात्म ,ज्ञान ,विज्ञान तंत्रज्ञान ,योग आणि ध्यान या पंचतत्वाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त प्रेरणा जागृत करून कौशल्यवर्धनाचा हा प्रयत्न आहे.

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना निशुल्क या गुरुकुल अध्ययन प्रणाली द्वारे अध्ययनाची संधी मिळणार आहे. उपक्रमास शुभेच्छा देताना विनायक अभ्यंकर म्हणाले विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत (Talegaon Dabhade) निश्चितच हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावणार आहे उत्कृष्ट नियोजन, यशस्वी अंमलबजावणी याद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जाईल यात शंका नाही.

गुरुकुल प्रणालीमध्ये राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. उपस्थित मान्यवरांच्या आभार विद्यालयाच्या पर्यवेक्षिका रेखा भेगडे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभा काळे व सुवर्णा काळडोके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम (Talegaon Dabhade) घेतले.

Follow Us On