मावळ ऑनलाईन- जुन्या भांडणाचा राग मनात धरून सात ते आठ जणांच्या टोळक्यांनी एका तीस वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी लोणावळा ( Dahiwali Crime News) ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना मंगळवारी (दि.8) मध्यरात्री दहिवली गावातील फाईव स्टार विला येथे घडली.
याप्रकरणी विकी रमेश सलपे (वय 30 कल्याण- ठाणे) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी नितीन कोटा, देवेश उर्फ देवा प्रभाकर भगत, प्रमोद रोहिदास कोनकर, अमित जाह, हुकूम यादव, प्रदीप सिंग, अमित राय, गणेश पाटील या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे सर्वजण मुंबईतील कल्याण व ठाणे परिसरात राहणारे रहिवासी (Dahiwali Crime News) आहेत.
Lonavala Bus Accident : लोणावळ्याजवळ एसटी बसचा भीषण अपघात एकाचा मृत्यू तर नऊ जण जखमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दहिवली येथील फाईव्ह स्टार विला येथे काम करतात. यावेळी आरोपी देखील मंगळवारी रात्री फाईव्ह स्टार विला येथे आले. फिर्यादी पूर्वी काम करत असलेल्या सेंचुरी रॉयल कंपनीत झालेल्या वादाच्या कारणातून आरोपींनी फिर्यादी याना मारहाण करणे सुरुवात केली. यावेळी त्यांना काचेच्या बाटलीने लाथाबुक्क्याने मारहाण करत व्हीलाच्या खिडकीतून ढकलून दिले .यामध्ये फिर्यादी हे जखमी झाले असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ( Dahiwale Crime News) आहे.