मावळ ऑनलाईन – मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मुंबई लाईन मध्ये एका एसटी बसने कंटेनरला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालकाच्या जागीच मृत्यू झाला ( Lonavala Bus Accident ) असून यात 9 जण जखमी झाले आहेत.
Lohagad: लोहगड आणि विसापूर किल्ल्यांना तारेच्या कंपाउंडचा वेढा, शिवप्रेमींमध्ये नाराजी
अपघात रात्री उशिरा लोणावळा पासून किलोमीटर 49 येथे घडला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने महामंडळाची एसटी बस समोर जाणाऱ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडकली. यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर वाहकासह इतर आठ प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही बस बारामती आगाराची होती, जी मुंबईच्या दिशेने निघाली ( Lonavala Bus Accident ) होती.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व आपत्कालीन यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केले मात्र या अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर काही काळ वाहतूक कोंडी झाली ( Lonavala Bus Accident ) होती.