situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Krishnarao Bhegde : कृष्णराव भेगडे हे आदर्श विचारांचे विद्यापीठ- रामदास काकडे

Published On:
Krishnarao Bhegde

इंद्रायणी संस्थेतर्फे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांना सामुदायिक श्रध्दांजली

मावळ ऑनलाईन – नाव जगाच्या नकाशावर कोरणारा दूरदृष्टीचा नेता तसेच अर्बन लॅण्ड सिलिंगचा तळेगाव पॅटर्न तयार करून तो देशभर राबवण्याचे श्रेय यामुळे कृष्णराव भेगडे ( Krishnarao Bhegde) यांचा आदराने उल्लेख केला जातो असे सांगताना रामदास काकडे यांनी विद्यार्थी ते संस्थेचा अध्यक्ष याकाळातील त्यांचा कृष्णराव भेगडे यांच्याशी आलेला संबंध उलगडवून सांगितला. ते म्हणाले, की भेगडे साहेब हे आदर्श विचारांचे विद्यापीठ होते. माणूस मोठा झाल्यानंतरही जमिनीवर पाऊल ठेवून कसा वावरतो याचे ते आदर्श उदाहरण ठरले.


आदिवासींच्या विकासासाठी मावळात त्यांनी ५३ वर्षांपूर्वी दिलेले योगदान कालातीत आहे. विधानमंडळातील कृष्णराव भेगडे आणि रामभाऊ म्हाळगी यांची भाषणे नवशिक्या आमदारांना अभ्यासासाठी आजही उपलब्ध आहेत. विधिमंडळाच्या अधिवेशनांचे समालोचन त्यांच्या आकलनाची खोली दर्शविणारी असत. आरोग्य, उद्योग, शेती, शिक्षण, समाज यांची सखोल जाण असलेल्या नेता म्हणून भेगडे साहेबांचे कार्य कालातीत आहे. शैक्षणिक क्षेत्रात तर त्यांचे अद्वितीय काम आहे. त्याचबरोबर चाकण, तळेगाव एमआयडीसी उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अशा अनेक आठवणी जागून इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी कृष्णराव भेगडे यांना शब्दांजली वाहिली.

Talegaon Dabhade: सरस्वती विद्यामंदिर च्या चिमुकल्यांनी विठु माऊलीच्या गजरात साजरा केला दिंडी सोहळा

माजी आमदार कृष्णराव भेगडे ( Krishnarao Bhegde) यांचा स्वभाव, सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीतील आचार-विचारांचे पैलू आणि आठवणीतील प्रसंगांना उजाळा देत येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेतर्फे त्यांना अनेक मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. संस्थेचे माजी अध्यक्ष कृष्णराव भेगडे हे आदर्श विचारांचे विद्यापीठ असल्याची भावना अध्यक्ष रामदास काकडे यांनी यावेळी व्यक्त केली. तर कार्यकर्ते घडविणारे नेते म्हणून कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.

Mumbai:मुस्लिम अत्याचाराच्या प्रश्नावर सर्व आमदार एकाच मंचावर; नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने उद्या मुंबईत गोलमेज परिषदेचे आयोजन

सोमवारी (दि.७) इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेतर्फे माजी आमदार कृष्णराव भेगडे ( Krishnarao Bhegde) यांच्या श्रध्दांजलीपर सभेस संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे,सदस्या निरूपा कानिटकर -किबे, संदीप काकडे, युवराज काकडे, संजय साने, विलास काळोखे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे व डॉ. संजय आरोटे, डॉ. गुलाब शिंदे, यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साहेबराव पाटील यांच्यासह सर्व आजीमाजी पदाधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिव्हाळा असलेला नेता हरपला- चंद्रकांत शेटे

(कै.) कृष्णराव भेगडे यांच्या श्रध्दांजलीपर भाषणात बोलताना ( Krishnarao Bhegde) चंद्रकांत शेटे म्हणाले की, भेगडे साहेब हे केवळ मावळचेच नव्हे, तर जिल्ह्याचे दूरदृष्टिच्या विचारांचे नेते होते. तळेगावची संस्कृती जपली पाहिजे, यासाठी त्यांनी सतत अट्टाहास धरला. नागरिकांचे वर्तन कसे असावे, यांचा त्यांनी आदर्श वस्तूपाठ घालून दिला. जनसंघ ते काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता ही त्यांची खरी ओळख. अनेकांच्या व्यक्तिगत आयुष्यातही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. हे सांगताना ते भावुक झाले. विधानसभेच्या निवडणुकीत साहेबांचा पराभव झाला, त्यावेळी तळेगावात एकही चूल पेटली नाही, एवढा जिव्हाळा असणारा नेता हरपल्याची भावना शेटे यांनी श्रध्दांजलीपर मनोगतातून व्यक्त केली.

यावेळी शिक्षिका सुलोचना इंगळे, शिवणे येथील रवींद्र शेळके, विज्ञान विभागप्रमुख प्रा. उत्तम खाडप, उपप्राचार्य प्रा. संदीप भोसले, प्राचार्य संजय आरोटे,डॉ. संभाजी मलघे, प्राचार्य डॉ.साहेबराव पाटील, सुरेश चौधरी,विलास भेगडे, हरिश्चंद्र गडसिंग, निरुपा कानिटकर, संदीप काकडे, आदींनी कै. कृष्णराव भेगडे यांच्याप्रति भावना व्यक्त केल्या. सामुदायिक श्रध्दांजलीने सभेची सांगता झाली. प्रा. आर.आर. डोके आणि विजय खेडकर यांनी सूत्रसंचालन ( Krishnarao Bhegde) केले.

Follow Us On