मावळ ऑनलाईन – कारकेवस्ती, कुसगाव बु. येथे (Kusgaon Crime News) जमिनीच्या वादातून दोन जणांनी एका नागरिकाच्या घरात घुसून त्यास मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pimpri- Chinchwad : पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे ‘देवेंद्र पर्व’
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जून रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास कारकेवस्ती, कुसगाव बु. (Kusgaon Crime News) येथील घरी असताना राजेंद्र दत्तु ठुले (रा. डोंगरगाववाडी) व प्रविण गुंड (रा. साठेवस्ती, कुसगाव बु.) या दोघांनी जबरदस्तीने घरात प्रवेश केला. त्यांनी संबंधितास उद्देशपूर्वक हाताने मारहाण केली व “आपटी येथील सर्व्हे नं. २१५/१ या जमिनीवर जेसीबीचे काम का थांबवलेस?” असे विचारून शिवीगाळ करत दमदाटी केली.
Talegaon Dabhade: गोल्डन रोटरी चा पदग्रहण समारंभ दिमाखात साजरा
तसेच “तुझे घराचे गेट तोडून टाकीन, तुझा रस्ता उखडून टाकीन व तुला आता सोडणार नाही,” असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे संबंधितास शारीरिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागला.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध भा.दं.सं. कलम ३३३, ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत (Kusgaon Crime News)आहेत.