मावळ ऑनलाईन – शिवीगाळ करू नको, असे म्हणाल्याच्या कारणावरून चौघांनी एका व्यक्तीला मारहाण केली. देहूरोड येथील गांधी नगरमधील नवीन पाण्याच्या टाकीमागे गुरुवारी (१३ जून) सकाळी नऊच्या सुमारास ही घटना ( Dehuroad Crime News) घडली.
Vadgaon Maval : वडगाव मावळ नगरपंचायतीची प्रभाग रचना प्रक्रिया १७ जूनपासून सुरू
अनिल चंद्रकांत काळखैर (वय ५०, रा. गांधीनगर, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चंदु गोरख सकट (वय ३८), करण अरुण सकट (वय २३, दोघे रा. गांधीनगर, देहूरोड) आणि त्यांच्या दोन साथीदारांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
Alandi : आळंदीतील रस्त्यावरील दिव्यांच्या खांबावर लावलेल्या बॅनरमुळे धोका
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिल घरी जात होते. त्यावेळी संशयित हे दारु पित होते. संशयितांनी शिवीगाळ केली. शिवीगाळ करू नको, असे फिर्यादी म्हणाले. त्याचा राग मनात धरून चौघांनी फिर्यादीच्या घरात घुसून लोखंडी कोयता, रॉड आणि बॅटने जबर मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले ( Dehuroad Crime News) आहे.