मावळ ऑनलाईन – देहूरोड येथे थॉमस कॉलनी जंगल परिसरालगत एका तरुणाचा खून झाल्याची घटना गुरुवारी (12 जून) पहाटे उघडकीस आली. हा खून लव्ह ट्रँगल मधून झाला आहे. खून झालेल्या तरुणाचा चुलत भाऊ आरोपीच्या हल्ल्यात ( Dehuroad murder case)जखमी झाला. या गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखा युनिट पाचने गुजरात मधून अटक केली आहे.
सनीसिंग राजीवसिंग राजपूत (19, शिवान, बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दिलीप मोरिया (16) असे खून झालेल्या तरुणाचे नावे आहे. अरुण मोरीया (14) हा जखमी झाला आहे. अरुण याने याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमटणे फाटा येथील एका तरुणीचे दिलीप याच्यासोबत प्रेमासंबंध होते. त्याच तरुणीचे सनी सिंग याच्यासोबतही प्रेम संबंध होते. तीन महिन्यांपूर्वी दिलीप आणि सनी या दोघांचे या कारणावरून भांडण झाले होते. बुधवारी रात्री दिलीप याने चुलत भाऊ अरुण याला फोन करून थॉमस कॉलनी जवळ जंगल परिसरात बोलावून घेतले. तिथे सनी सिंग आणि दिलीप यांचे भांडण झाले. भांडण सोडविण्यासाठी अरुण मध्ये पडला. सनी याने अरुण वर चाकूने हल्ला केला. अरुण जखमी अवस्थेत थॉमस कॉलनी मध्ये आला. त्याने मित्रांना घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. अरुण याला कंटोनमेंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात ( Dehuroad murder case)आले.
Kabaddi Player Assaulted : कबड्डीपटू युवतीवर अत्याचार प्रकरणी तिघांना अटक
घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र थॉमस कॉलनी जवळील जंगल परिसरात दिलीप याचा शोध लागला नाही. रात्रभर पोलीस दिलीपचा शोध घेत होते. गुरुवारी पहाटे सव्वा पाच वाजताच्या सुमारास पुणे मुंबई महामार्गालगत सर्विस रोडच्या खाली दिलीप याचा मृतदेह आढळून आला.
त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी सनी सिंग याचा पाठलाग केला. आरोपी वडोदरा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वडोदरा येथे जाऊन सनी सिंग याला अटक केली ( Dehuroad murder case) आहे.