situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Crime News 30 April 2025 : पीएमपीएमएल बसच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू

Published On:
Pimpri Chichwad Crime News 05 May 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – खराडी परिसरात एका पीएमपीएमएल बस चालकाच्या बेपर्वाईमुळे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. ही घटना २९ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ब्ल्युबेरी चौक, खराडी येथे ( Pune Crime News 30 April 2025) घडली.

मारोती आरसुळ (वय ३५, रा. खराडी गावठाण, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची आई महानंदा मुंजाजी आरसुळ (वय ७१) या रस्त्यावरून जात असताना पीएमपीएमएल बस चालकाने भरधाव व बेधडक वेगात बस चालवली. यामध्ये महानंदा आरसुळ यांना जोरदार धक्का बसून त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मोनाली भदे करत आहेत.

२. शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ३८ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक ( Pune Crime News 30 April 2025)

पुणे – मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवत एका व्यक्तीची तब्बल ३८ लाख २४ हजार रुपयांनी ऑनलाईन फसवणूक करण्यात आली.

५१ वर्षीय व्यक्ती, रा. टिंबर मर्चंट कॉलनी, खडक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नोव्हेंबर २०२४ ते डिसेंबर २०२४ दरम्यान एका मोबाईल धारकाने शेअर ट्रेडिंग व आयपीओ गुंतवणुकीच्या बहाण्याने अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगितले आणि आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्या बँक खात्यातून ३८.२४ लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले.

तपास खडक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनोजकुमार लोंढे करत आहेत.

Pune Crime News: कोंढवा परिसरात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित रजनीगंधा पानमसाला जप्त

३. गर्दीचा फायदा घेत महिला प्रवाशाच्या दागिन्यांची चोरी ( Pune Crime News 30 April 2025)

पुणे – रेल्वे स्टेशनजवळील भोसरी बस स्टॉप येथे बस प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेत अनोळखी महिलेनं एका प्रवाशाच्या १.८५ लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली.

५० वर्षांची महिला, रा. बालाजी फेल, शेगाव, जि. बुलढाणा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११.४५ ते १२.०० च्या सुमारास त्या बसने प्रवास करत असताना, कोणीतरी अनोळखी महिलेनं त्यांच्या जवळील रोकड व सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम करीत आहेत.

४. शुक्रवार पेठेत फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्यांनी २.२६ लाखांचा ऐवज चोरला ( Pune Crime News 30 April 2025)

पुणे – शुक्रवार पेठेतील एका अपार्टमेंटमध्ये बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल २ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना २९ एप्रिल २०२५ रोजी उघडकीस आली.

४१ वर्षीय व्यक्ती, रा. २५१ शुक्रवार पेठ, पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा फ्लॅट कुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप उचकटून घरात प्रवेश केला व टेबलच्या ड्रॉवरमधील रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २.२६ लाखांचा ऐवज चोरून नेला.

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे करत आहेत.

MLA Sunil Shelke : रस्त्यांच्या कामांत दिरंगाई सहन केली जाणार नाही – आमदार शेळके यांचा इशारा

५. कर्वेनगरातील ५४ वर्षीय व्यक्तीस १७.५७ लाखांची ऑनलाईन फसवणूक ( Pune Crime News 30 April 2025)

पुणे – शेअर ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका ५४ वर्षीय व्यक्तीस १७ लाख ५७ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे.

ही घटना २५ फेब्रुवारी ते ४ एप्रिल २०२५ या कालावधीत घडली. फिर्यादी, रा. कर्वेनगर, पुणे, यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एका मोबाईल धारकाने त्यांना शेअर ट्रेडिंग व आयपीओमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवले आणि त्यांच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने पैसे ट्रान्सफर करून घेतले.

तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे करत आहेत.

६. पार्किंगच्या वादातून चाकू हल्ला; अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी ( Pune Crime News 30 April 2025)

पुणे – भवानी पेठेत पार्किंगच्या वादातून जमावाने एकत्र येत एका कुटुंबावर हल्ला केला. यामध्ये एका अल्पवयीन मुलावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले.

५३ वर्षीय फिर्यादी, रा. भवानी पेठ, पुणे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, त्यांचा मुलगा आयान हा टीव्ही उतरवत असताना काही इसमांनी पार्किंगवरून वाद घालून त्याच्या मोटरसायकलला लाथ मारली. त्यानंतर फिर्यादी, त्यांचा भाऊ रिझवान आणि मुलगा आयान यांनी स्पष्टीकरण विचारण्यासाठी गेल्यावर १० ते १२ जणांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात आयान याच्या पोटावर चाकूने वार करण्यात आला.

या गंभीर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल कदम करत आहेत.


Follow Us On