situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Crime News: नांदेड सिटी परिसरात दहशत माजवणाऱ्या दोघांना लोखंडी हत्यारासह अटक

Published On:
Kamshet Crime News
---Advertisement---

Team MyPuneCity – शिवणे नांदेड रोड परिसरात दहशत माजवत सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करणाऱ्या आणि लोखंडी हत्याराने इतरांना धमकावणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट ३ आणि नांदेड सिटी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई दि. २१ एप्रिल २०२५ रोजी रात्री करण्यात आली.

गुन्हे शाखा युनिट ३ अंतर्गत असलेले पोलीस कर्मचारी संभाजी कोंढावळे, दिनेश झोळे आणि दिपक सपकाळ हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार नांदेड गाव परिसरात गस्त घालीत असताना, शिवशंकर अमृततुल्य हॉटेलजवळ दोन इसम स्थानिक नागरिकांशी अरेरावी करत असल्याचे निदर्शनास आले. “आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादाला कोणी लागू नये,” अशा प्रकारे त्यांनी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. त्यातील एक इसम हातात लोखंडी हत्यार घेवून मोठमोठ्याने आरडाओरडा करत होता.

पोलीसांनी तत्काळ दोघांनाही ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपली नावे अनुराग संभाजी दारवटकर (वय २८, रा. नांदेडगाव, पुणे) आणि विजय अशोक तारू (वय २२, रा. नांदेडगाव, पुणे) अशी सांगितली. नंतर त्यांना नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे रात्रगस्त अधिकारी परि.पोलीस उपनिरीक्षक जया सोनटक्के आणि त्यांच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले.

या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त निखिल पिंगळे आणि सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कामगिरीत पोलीस अंमलदार संभाजी कोंढावळे, दिनेश झोळे आणि दिपक सपकाळ यांचा मोलाचा वाटा होता.



https://youtu.be/AwU80BMOQnY?si=uOced68scXG6Smoi

Follow Us On