situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Yugendra Pawar: मावळ राष्ट्रवादीचा युगेंद्र पवार घेणार आढावा

Published On:
ncp

मावळ ऑनलाईन –आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने(Yugendra Pawar) हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासाठी पक्षातील प्रमुख पदाधिकारी तालुकावार बैठका घेत आहेत. युगेंद्र पवार यांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघात बैठक घेतली. त्यानंतर ते मावळ विधानसभा मतदारसंघात शनिवारी (२७ सप्टेंबर) कार्यकर्ता आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांमधील पक्षाची भूमिका काय असेल, याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत.

राष्ट्रवादीने राज्यात युवा, विद्यार्थी, शेतकरी, बेरोजगार, महिला सुरक्षा, कामगार, अंगणवाडी सेविका यांच्या प्रश्नांबाबत मावळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात राष्ट्रवादीने वडगाव मध्ये एल्गार केला. वडगाव मावळ आणि परिसरात सुरु असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले होते. राष्ट्रवादीने महावितरण कार्यालयावर आंदोलन करून महावितरणच्या अधिकाऱ्यांना गुलाबाची फुले देऊन त्यांचा उपरोधिक सत्कार करण्यात आला. या आंदोलनांची तालुक्यात चर्चा झाली.

Lonavala:लोणावळा शहर कचरा व्यवस्थापनासाठी बायो-CNG प्रकल्पास हिरवा कंदील

Pune :सहकारनगर पोलीस ठाण्यात जप्त 16 बिनधनी दुचाकी; वाहन मालकांना सात दिवसांत संपर्क साधण्याचे आवाहन

वडगाव मावळ येथील हॉटेल श्रीकृष्ण येथे शनिवारी दुपारी अडीच वाजता होणाऱ्या बैठकीसाठी पुणे जिल्हाध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, माजी मंत्री मदन बाफना, महिला जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे, युवक पुणे जिल्हाध्यक्ष प्रमोदसिंह गोतारणे, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष, पुणे आणि मावळ तालुक्याचे प्रभारी अतुल राऊत, मावळचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, महिलाध्यक्ष रत्नमाला करंडे, युवक तालुकाध्यक्ष विशाल वहिले, माजी जिल्हा परिषद सदस्य किसनराव कदम, विद्यार्थी अध्यक्ष अक्षय मुऱ्हे, संपर्कप्रमुख विजय शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत.

दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्यानंतर तालुक्याचे आमदार अजित पवार यांच्या पक्षात गेले. त्यानंतर माजी मंत्री मदन बाफना यांच्यासारख्या जुन्या जाणकार मंडळींनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. नव्या जुन्या कार्यकर्त्यांची बांधणी करून पक्ष पुन्हा आपली वाटचाल करत आहे. असे असताना पक्षश्रेष्ठींकडून हवे तेवढे मावळात लक्ष दिले जाणे महत्वाचे आहे.


पक्षाच्या संघटनात्मक कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली जात आहे. यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

  • विशाल वहिले, युवक अध्यक्ष, राष्ट्रवादी (शरद पवार)

Follow Us On