मावळ ऑनलाईन – वारंगवाडी मावळ (Warangwadi News) येथील शेतकरी कुटुंबातील छाया रामदास नखाते (वय ४२) यांचे अपघाती निधन झाले.
गुरुवार (दि११) इंदोरी येथील बाह्य वळण रस्त्यावर दुपारी १:३० सुमारास त्यांचा दुचाकीवरून येताना अपघात झाला होता. उपचारार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज रविवारी (दि १४) पहाटे त्यांचे निधन झाले.
Bapusaheb Bhonde Highschool : ॲड बापूसाहेब भोंडे हायस्कूलमध्ये राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा
त्यांच्या पश्चात पती, मुलगा मुलगी सून नातू असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते रामदास नखाते (Warangwadi News) यांच्या त्या पत्नी तर युवा कार्यकर्ते गणेश नखाते यांच्या त्या मातोश्री होत.
वारंगवाडी येथील इंद्रायणी नदीकाठी त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.