मावळ ऑनलाईन – श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास लाभलेले प्रमुख अतिथी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे (Vivekananda English School)अध्यक्ष श्री प्रवीण भोसले सर, श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष खांडगे , उपाध्यक्ष दादासाहेब उऱ्हे ,शालेय समिती अध्यक्षा रजनीगंधा खांडगे ,कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे , खजिनदार सुदाम दाभाडे , सल्लागार शबनम खान, श्री राम कुबेर , शाळेच्या आदरणीय मुख्याध्यापिका, रेणू शर्मा सर्व रो. इत्यादी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.
Talegaon Dabhade News : श्री गणेश तरूण मंडळाचा सार्वजनिक गणेशोत्सव सन २०२५ – २०२६ चा अहवाल प्रकाशन सोहळा संपन्न
Akurdi Crime News : आकुर्डी येथे गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते ध्वजवंदनाने झाली. सौ किरण पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाविषयी मनोगत व्यक्त केले. तसेच कु. सिया उमरिया हिने स्वातंत्र्य दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष प्रवीण भोसले सर यांनी देशाबद्दल अभिमान व्यक्त करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स डिजिटल वर्ल्ड याविषयी माहिती दिली.
“आजचे विद्यार्थी ही उद्याची नागरिक आहेत, त्यांच्या हातात देशाचे भविष्य आहे. पुढे जबाबदार नागरिक बनून . देशाची व स्वतःची भविष्य उज्वल करून आपल्या गुरुजनांचे व आई वडिलांचे नाव मोठे करा” असा संदेश श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री संतोष खांडगे सर यांनी दिला.
यानंतर रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी विवासिटी अँड हॉस्पिलिटी प्रायव्हेट लिमिटेड व श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे यांच्यातर्फे स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या शालेय क्रीडा खेळाडूंना क्रीडा गणवेशाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका रेणू शर्मा, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रतिभा शिरसाट मॅडम यांनी केले. नंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते खाऊवाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.