मावळ ऑनलाईन – विसापूर किल्ल्याजवळ गिर्यारोहणासाठी ( Visapur Fort) आलेल्या एका तरुणाचा तोल जाऊन डोंगर उतरताना खाली कोसळल्याने मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवारी) दुपारी घडली.
या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला असून, प्रसंगावधान राखत शिवदुर्ग मित्रच्या सदस्यांनी तातडीने मदतीस धाव घेतली आणि तरुणास सुरक्षित रितीने खाली आणण्यात यश मिळवले.
Pratibha College : विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणातून अनुभव आत्मसात करावा – डॉ.दीपक शाह
प्राप्त माहितीनुसार, सागर कुंभार, सागर दळवी, मोरेश्वर मांडेकर, यश मसने, राजेंद्र कडू, पिंटू मानकर, ओंकार पडवळ आणि अशोक उंबरे या सदस्यांनी सजगपणे ( Visapur Fort) आणि एकजुटीने काम करत, जखमी तरुणाला किल्ल्याच्या पायथ्याशी आणले. जखमी मुलाच्या डोक्याला गंभीर मार लागून त्याचा मृत्यू झाला.
लोणावळा ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत