मावळ ऑनलाईन – मावळ पंचक्रोशीसह पुणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध असलेले ( Vilas Kalokhe) काळोखे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे कार्यकारी संचालक, प्रसिद्ध उद्योजक विलास बबनराव काळोखे यांना त्यांच्या मागील ४० वर्षातील यशस्वी उद्योजकतेबद्दल धाराशिव येथील गणेश हॉलमध्ये झालेल्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र अधिवेशन २०२५ मध्ये “अर्थव्यवस्थेचे पंचप्राण व्यापार (उद्योग)पुरस्कार २०२५” ने सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.
Accident : भीषण अपघातात चालकाचे पाय अडकले रिक्षात, अग्निशमन दलाच्या जवानानी केली सुटका
यावेळी धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी,ग्राहक पंचायतीचे राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड यांसह कैलास पाटील, राणा जगजीतसिंह पाटील,धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर, सोलापूर मनपाच्या अतिरिक्त आयुक्त रवी पाटील, व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या हस्ते उद्योजक विलास काळोखे यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात ( Vilas Kalokhe) आले.
याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष भगवान शिंदे,हरीओम ग्रुपचे मुख्य संचालक तथा उद्योजक संग्राम जगताप, तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष अतुल पवार याप्रसंगी उपस्थित होते. गौरवचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुछ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
प्राप्त पुरस्काराला उत्तर देताना उद्योजक विलास काळोखे म्हणाले, उद्योग व्यापार क्षेत्रातील पंचप्राण म्हणून आज माझा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान झाला, तो मी काळोखे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक हाताला समर्पित करतो. महाराष्ट्र राज्य ग्राहक पंचायतीतर्फे अर्थव्यवस्थेचा पंचप्राण म्हणून संबोधित केल्याने उद्योग आणि ग्राहक समीकरण अधिक दृढ करण्याची जबाबदारी वाढली ( Vilas Kalokhe) आहे.