मावळ ऑनलाईन – श्री विघ्नहर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, इंदुरी ( Vighnahar Patasanstha)यांच्या वतीने दसरा-दिवाळी निमित्त “महिला सन्मान ठेव योजना २०२५” अंतर्गत एक भव्य आणि उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आज शुक्रवार, दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी संस्थेच्या कार्यालयात या योजनेअंतर्गत मुदत ठेव केलेल्या महिलांना आकर्षक पैठणी भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
Shrikrishna Zakatdar : श्रीकृष्ण जकातदार यांचे ज्योतिष शास्त्रातील कार्य मोलाचे – उदयराज साने
कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुरेखा ताई शेवकर व सौ. कोमल ताई शिंदे यांनी कौशल्यपूर्णरीत्या केले, तर आभार प्रदर्शन सौ. प्रतीक्षा ताई ढोरे व ॲड. नेहा ताई शिंदे यांनी केले. महिलांसाठी खास अल्पोपहार व चहापान आयोजित करून कार्यक्रमाचा समारोप आनंदी वातावरणात करण्यात आला.
Shrikrishna Zakatdar : श्रीकृष्ण जकातदार यांचे ज्योतिष शास्त्रातील कार्य मोलाचे – उदयराज साने
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक भगवान भाऊ शेवकर, ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. जगन्नाथ शेवकर, साईनाथ भाऊ बाणेकर, चेअरमन स्वप्निल सूर्यकांत भागवत, उपाध्यक्ष आदित्य गुलाबराव शेवकर, सचिव सौ. राधिका भगवान शेवकर, कोषाध्यक्ष श्री. प्रविण विष्णू दगडे, तसेच श्री. त्यागराज शंकरराव शेवकर, श्री. दत्तात्रय तुकाराम शेवकर, श्री. निलेश मच्छिंद्र शेवकर, श्री. रामदास शंकर भांड, श्री. किशोर दशरथ ढोरे आणि श्री. सोमनाथ पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी उपस्थित नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देत, या योजनेला मिळालेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल महिलांचे आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.विघ्नहर पतसंस्थेचा हा उपक्रम केवळ आर्थिक व्यवहारापुरता मर्यादित न राहता समाजातील महिलांच्या सन्मान, प्रोत्साहन आणि आर्थिक सबलीकरणाचा एक सुंदर प्रयत्न ठरला ( Vighnahar Patasanstha) आहे.