मावळ ऑनलाईन – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ( Vadgaon News) सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी 750 व्या जयंती निमित्त वडगाव नगरपंचायतीकडून पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. नगर पंचायतीचे मुख्याधिकारी प्रवीण निकम यांनी याबाबत माहिती दिली.
वडगाव शहरातील सर्व वारकरी सांप्रदाय, भाविक, नागरिक, सर्वपक्षीय पदाधिकारी व मान्यवर यांना नगरपंचायत द्वारे आवाहन करण्यात येते की, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे सन 2025 हे वर्ष सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी 750 जयंती वर्ष ( Vadgaon News) आहे.
त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या सूचनानुसार वडगाव नगरपंचायत मार्फत उद्या (शुक्रवार) सायंकाळी 5 ते 7 या वेळेत श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज प्रतिमा/मूर्तीची पालखीतून मिरवणुकीचे आयोजन केले आहे. पालखी चे प्रस्थान महाराज देवस्थान मंदिर पासून ते खंडोबा मंदिर ते नगरपंचायत कार्यालय असे असणार आहे.
शहरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखी मिरवणुकीची शोभा वाढवावी, असे आवाहन डॉ. प्रविण निकम, मुख्याधिकारी तथा प्रशासक, वडगांव नगरपंचायत ( Vadgaon News) यांनी केले आहे.