situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Vadgaon Nagar Panchayat : वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी २४ मतदान केंद्रांची तयारी पूर्ण

Published On:
Vadgaon Nagar Panchayat

सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण; २ डिसेंबरला मतदान

मावळ ऑनलाईन – वडगाव नगरपंचायतीच्या (Vadgaon Nagar Panchayat) आगामी निवडणुकीसाठीची प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. एकूण १७ प्रभागांसाठी २४ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, नागरिकांना सुरळीत मतदानाचा अनुभव मिळावा यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम यांनी दिली.

शुक्रवारी (दि ७) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पुनर्वसन तहसीलदार,निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा तेलभाते यांनी सांगितले की, यंदा नगराध्यक्ष व १७ नगरसेवकांची निवडणूक होणार आहे. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू होईल, तर २ डिसेंबर रोजी मतदान आणि त्यानंतर मतमोजणी नगरपंचायतीच्या सभागृहातच पार पडेल.

निवडणुकीचा कार्यक्रम व तारखा (Vadgaon Nagar Panchayat)

७ नोव्हेंबर: अंतिम मतदार यादी व प्रभाग रचना प्रसिद्ध

१० ते १७ नोव्हेंबर: उमेदवारी अर्ज स्वीकृती कालावधी,(मात्र १६ नोव्हेंबरला रविवारी सुट्टीचा दिवस त्यामुळे नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत)
१८ नोव्हेंबर: अर्जांची तपासणी व यादी प्रसिद्ध
१९ते २१ नोव्हेंबर: अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस
२१ ते २५ नोव्हेंबर अपीलाचा दिनांक

२६ नोव्हेंबर चिन्ह वाटप
२ डिसेंबर: मतदान प्रक्रिया
३ डिसेंबर: मतमोजणी व निकाल जाहीर

उमेदवारी अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे (Vadgaon Nagar Panchayat)

उमेदवारांना अर्ज ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही माध्यमांतून सादर करता येणार आहेत. अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे

जात प्रमाणपत्र (आरक्षित जागांसाठी) (Vadgaon Nagar Panchayat)


संपत्ती व कर्जाची माहिती असलेला दाखला,नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, शौचालय अस्तित्वाचा दाखला, अपत्य संख्या नोंद (कुटुंब नियोजन प्रमाणपत्र),वयाचा पुरावा (जन्म दाखला),नगरपंचायतीची थकबाकी नसल्याचा दाखला या सर्व दाखल्यांची सोय करण्यासाठी नगरपंचायतीच्या वतीने विशेष सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे.

अनामत रक्कम व खर्च मर्यादा (Vadgaon Nagar Panchayat)

उमेदवारांसाठी अनामत रक्कम खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे –खुला वर्ग: ₹१०००,
आरक्षित वर्ग: ₹५०० निवडणुकीतील खर्च मर्यादा:नगराध्यक्ष पदासाठी: ₹ ६ लाख रुपये
नगरसेवक पदासाठी: ₹२.२५ लाख रुपये प्रत्येक उमेदवाराने निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक आहे.

आचारसंहिता लागू – सोशल मीडियावरही देखरेख (Vadgaon Nagar Panchayat)

४ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू झालेली असून, तिची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील लक्ष ठेवले जाणार आहे.आचारसंहिता भंग झाल्यास तत्काळ कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

मतदान केंद्रांची यादी, प्रभाग मतदान केंद (Vadgaon Nagar Panchayat)

१ व २ केशवनगर व कातवी जिल्हा परिषद शाळा,
३ ते ८ रमेशकुमार सहानी स्कूल
८ ते ११ जिल्हा परिषद शाळा, पंचायत समिती मावळ, पीडब्ल्यूडी कार्यालय
१२ ते १५ न्यू इंग्लिश स्कूल
१६ व १७ पोद्दार इंटरनॅशनल स्कूल

मतदारसंख्या व जनजागृती उपक्रम (Vadgaon Nagar Panchayat)

वडगाव शहरात एकूण १९,८४७ मतदार नोंदले गेले ( Vadgaon Nagar Panchayat) असून, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाकडून जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि निवडणूक पथके सहभागी होणार आहेत.

मतदानाच्या दिवशी वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी विशेष सहाय्यक बूथ, रॅम्प सुविधा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. (Vadgaon Nagar Panchayat)

सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ. प्रविण निकम यांनी नागरिकांना आवाहन केले की,वडगाव नगरपंचायतीची निवडणूक पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. नागरिकांनी उत्स्फूर्ततेने मतदान करून लोकशाही मजबूत ( Vadgaon Nagar Panchayat) करावी.”

Follow Us On