मावळ ऑनलाईन –तरुणांनी व्यसनांपासून दूर राहत मोबाईलचा अतिवापर टाळावा, (Vadgaon Maval)तसेच समाज माध्यमांच्या आहारी जाऊ नये असे प्रतिपादन मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी केले.
वडगाव मावळ येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला,वाणिज्य बीबीए महाविद्यालयात नवोदित विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अशोक बाफना हे होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले,उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, संचालक प्रल्हाद जांभुळकर,राजेंद्र बाफना,चंद्रकांत ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
Maval: शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर; मावळ तालुका प्रमुखपदी राम सावंत यांची नियुक्ती
Pune: ‘पुरुषोत्तम’चा शुक्रवारी पारितोषिक वितरण समारंभ;नाना पाटेकर यांची प्रमुख उपस्थिती
तहसीलदार देशमुख बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा कोणत्याही क्षेत्रातील आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे श्री देशमुख म्हणाले
डिजिटल साधनांचा सदुपयोग विद्यार्थ्यांनी करावा या साधनांमध्ये जगातील अनेक प्रकारचे ज्ञान आपल्याला मिळते असे मार्गदर्शन अध्यक्षीय भाषणात अशोक बाफना यांनी विद्यार्थ्यांना यावेळी केले.
प्राचार्य अशोक गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. महादेव वाघमारे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ शितल दुर्गाडे यांनी आभार मानले. प्राध्यापक रोहिणी चंदनशिवे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ.शितल शिंदे, डॉ.जया धावरे,योगेश जाधव, प्रियांका पाटील, प्रणिता सूर्यवंशी, अनिल कोद्रे, प्रा.केंगले, प्रा ठाकरे प्रा.ओव्हाळ उपस्थित होते.