situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Vadgaon Maval: वारकरी नेेतृत्व गुण विकास कार्यकर्ता निवासी शिबीराची उत्साहात सांगता

Published On:
Vadgaon Maval

मावळ ऑनलाईन –वारकऱ्यांमध्ये देव, देश, धर्म यांबद्दल आत्मियता(Vadgaon Maval) निर्माण व्हावी आणि वारकऱ्यांमध्ये नेतृत्व गुणाचा विकास व्हावा या उद्देशाने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हभप नंदकुमार भसे,सचिव हभप रामदास पडवळ,उपाध्यक्ष दिलीप वावरे,कार्याध्यक्ष संतोष कुंभार यांच्या संकल्पनेतून मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने ओम रेस्टॉरंट, वेहेरगाव- दहिवली, ता.मावळ, जिल्हा पुणे येथे दि १९ व २० रोजी दोन दिवसीय निवासी वारकरी नेतृत्व गुण विकास कार्यकर्ता शिबीराचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले.

या शिबीराची सांगता बुधवार (दि२०) रोजी करण्यात आली. या शिबीरामध्ये ध्यानधारणा,प्रार्थना, संघटन,वारकरी सांप्रदायाचे महत्व, देव-देश- धर्म यांबद्दलचे मौलिक विचार व मार्गदर्शन अनेक अभ्यासू वक्त्यांकडून वारकऱ्यांना लाभले.

Talegaon Dabhade : आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत TDIA बैठकीत उद्योगनगरीच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय

Mumbai-Pune National Highway : बोरघाटात जड-अवजड वाहनांवर बंदी; अपघात रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

या दोन दिवसीय निवासी शिबीरासाठी मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे अनेक पदाधिकारी,विभागीय अध्यक्ष, विभाग प्रमुख,शहराध्यक्ष,विविध समित्यांचे अध्यक्ष व पदाधिकारी, ग्रामप्रतिनीधी आणि अनेक वारकरी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या निवासी शिबीरासाठी वेहेरगाव- दहिवली येथील वारकरी सांप्रदायाच्या पाईक हभप सुवर्णाताई कुटे यांनी सर्व वारकऱ्यांच्या मोफत निवासाची सुसज्ज अशी व्यवस्था केली, या शिबीरासाठी त्यांचे विशेष सहकार्य मंडळाला लाभले.

मंगळवार (दि१९) रोजी सकाळी ९ वाजता श्री पांडुरंगाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलन करून या शिबीराची सुरूवात करण्यात आली. या शिबीरामध्ये दोनही दिवशी प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय या संस्थेचे बी के सुदेशभाई,बी के नंदाताई (दीदी),बी के कल्पना( दीदी) यांचेकडून शिबीरार्थींकडून ध्यान साधना करून घेण्यात आली.

यावेळी सकाळच्या सत्रामध्ये मावळ तालुक्यातील अभ्यासू प्रवचनकार मंडळाचे संघटक ह.भ.प. गोपिचंद महाराज कचरे यांचे वारकरी संघटन व संतांची शिकवण या विषयावर मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच त्यानंतर आयुर्वेद आणि भारतीय संस्कृती या विषयांचा गाढा अभ्यास असलेले डॉ. सोपान महाराज कृष्णा मिसाळ यांनी मार्गदर्शन केले. यानंतर सायंकाळी शिबीरार्थी वारकऱ्यांचे मनोगत घेण्यात आले.

बुधवार (दि २०)रोजी सकाळी प्रार्थना आणि ध्यानधारणा झाल्यानंतर सर्व वारकऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. त्यानंतर मनशक्ती केंद्राच्या या क्रांतीताई हुक्केरीकर(जीवनदानी साधक) व भानुताई वैद्य (जीवनदानी साधक) यांच्याकडून शिबीरार्थी वारकऱ्यांना वारकरी संघटन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तद्नंतर ह.भ.प. गणेश महाराज गोणते यांनी वारकरी सांप्रदाय या विषयावर आपले परखड विचार मांडून प्रबोधन केले. यानंतर आयुर्वेदाचे तज्ञ डॉक्टर सोपान महाराज कृष्णा मिसाळ यांनी मार्गदर्शन केले.

यानंतर मावळ विचारमंचचे संस्थापक हभप भास्करराव म्हाळस्कर यांचे समारोपाचे भाषण झाले. त्यांनी वारकरी परंपरा, शिवछत्रपतीेंचे कार्य आणि आपल्या मावळभूमीचे महत्व विशद करून सर्वांचे उत्तम असे प्रबोधन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव हभप रामदास पडवळ यांनी केले. सर्वांचे आभार मंडळाचे कायदेशीर सल्लागार ॲड. सागर शेेटे यांनी मानले व त्यानंतर पसायदानाने या शिबीराची सांगता करण्यात आली.

Follow Us On