मावळ ऑनलाईन – अवैध हातभट्टी दारू निर्मिती (Vadgaon Maval)आणि विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी वडगाव मावळ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. डोणे गावच्या हद्दीत पोलिसांनी छापा टाकत अवैध दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि तयार दारू असा एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी ४५ वर्षीय महिला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई दि. २० ऑक्टोबर रोजी करण्यात आली. वडगाव मावळ पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कंझारभट वस्ती, डोणे-दिवड रोडजवळ पाण्याच्या टाकीसमोरच्या भागात अवैध हातभट्टी दारू निर्मिती सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ठिकाणी सापळा रचून छापा टाकला. तपासणीदरम्यान पोलिसांना मोठ्या प्रमाणात तयार हातभट्टी दारू तसेच निर्मितीसाठी लागणारे साहित्य आढळून आले.
Talegaon: तळेगाव ग्रामीण व गणपती मळा येथे प्रशांत दादा भागवत व मेघाताईंच्या उपस्थितीत साजरी झाली भाऊबीज; प्रेम, स्नेह आणि विकासाचा दीप पेटला!
Mulshi: काम करण्यास नकार दिल्याने पेंटरला मारहाण
या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रशांत जिजाभाऊ भोईर, हवालदार गार्डी, हवालदार संजय सुपे आणि म्हस्के यांनी ही संयुक्त कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
महिला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.



















