मावळ ऑनलाईन – तळेगाव स्टेशन ते कातवी गावाला जोडणाऱ्या जुन्या (Vadgaon Maval)पुलावर मोठे भगदाड पडल्याने या मार्गावरील वाहतुकीस गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पूलाची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून याठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून पुलाची पाहणी व दुरुस्ती करावी, अशी मागणी माजी नगरसेवक श्रीधर चव्हाण, ॲड दीपक चव्हाण, नाथा घुले, संतोष पिंपळे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस, विजय राऊत आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.
Sant Tukaram Palkhi : माऊलींच्या अनुपम भेट सोहळ्यानंतर संत तुकोबारायांचे देहुकडे प्रस्थान
हा पूल नवलाख उंब्रे एमआयडीसीसह अनेक शैक्षणिक संस्था आणि अंतर्गत गावांना जोडणारा मुख्य दुवा आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाखालील नाल्याची अनेक वर्षांपासून सफाई केली नसल्यामुळे पुलाखाली आणि आजूबाजूला राडारोडा साचलेला आहे. जंगली गवत वाढल्यामुळे पुलाची दृश्यता कमी झाली आहे आणि कठडेही झुडपांमुळे झाकले गेले (Vadgaon Maval)आहेत.
Sant Tukaram Palkhi : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आळंदीत पुष्पवृष्टीत स्वागत
नागरिकांची प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी
या पुलावरून दररोज अवजड वाहने,कामगार आणि विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसेस जात असतात. त्यामुळे हा पूल कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका आहे. पूल दुरुस्त होईपर्यंत या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करावी व पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी नागरिकांची मागणी असून स्थानिक प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग व तहसीलदार कार्यालयाने तातडीने याची गंभीर दखल घेण्याची गरज (Vadgaon Maval) आहे.