मावळ ऑनलाईन –देश सक्षम होण्यासाठी प्रत्येक तरुण सक्षम व्हायला हवा. त्यासाठी (Vadgaon Maval )तरुणांमध्ये शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक सक्षमता येणे आवश्यक आहे. तरुण सक्षम झाला तर कुटुंब सक्षम होईल, समाज सक्षम होईल, राज्य सक्षम होईल परिणाम आपला देश सक्षम होईल, असे प्रतिपादन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी केले. वडगाव मावळ येथील श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात सुरू असलेल्या सरस्वती व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफताना ते ‘युवकांनो पुढे या’ या विषयावर बोलत होते. तसेच त्यांनी युवकांना निर्व्यसनी राहण्याचा सल्ला दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी सुरेंद्र नवले तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार विक्रम देशमुख,उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोणपे, कायदेतज्ज्ञ ॲड केशव मगर,मंचचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष डॉ.रवींद्र आचार्य, व्याख्यानमालेचे अध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर,अजित देशपांडे,ॲड दामोदर भंडारी, धनश्री भोंडवे, आरती राऊत, संतोष भालेराव,अतुल म्हाळसकर आदी उपस्थित होते.
Yugendra Pawar: मावळ राष्ट्रवादीचा युगेंद्र पवार घेणार आढावा
Pune Airport: पुणे विमानतळावर ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी; तपासानंतर अफवा असल्याचे उघड
पोलिस अधीक्षक गिल पुढे बोलताना म्हणाले की जीवनात यशस्वी होण्यासाठी मेहनत, कठोर परिश्रम, जिद्द आणि शिस्त खूप महत्त्वाची असते. यासाठी तरुणांनी शारीरिक, मानसिक व अध्यात्मिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे .तसेच, अलीकडच्या काळात भरकटत चाललेल्या १२ ते १८ वयोगटातील मुलांना समजून सांगणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी त्यांचे मित्र होणे आवश्यक असून, ही जबाबदारी पालक, शिक्षक आणि समाजाची आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
तरुणांमध्ये ड्रग्जचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून त्या विरोधात जनजागृती करणे ही समाजाची जबाबदारी आहे. ड्रग्जला आळा घालण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. युवकांनी यासाठी पुढे येऊन जागृती घडवली पाहिजे असेही गिल यांनी सांगितले.
प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी सरस्वती व्याख्यानमालेच्या माध्यमातून अविरतपणे सुरू असलेली विचारांची चळवळ ही समाजाच्या हिताची असून, मावळ विचार मंचचे हे कार्य असेच सुरू राहिल, अशी अपेक्षा व्यक्त केली. तहसीलदार विक्रम देशमुख यांनीही मावळ विचार मंचच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
या वेळी भारतीय वेटलिफ्टिंग असोसिएशनचे सदस्य ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक सुधीर म्हाळसकर यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. सूत्रसंचालन हर्षदा दुबे यांनी केले. मानपत्र वाचन अमोल ठोंबरे यांनी केले, तर आभार संदीप भालेराव यांनी मानले.