भावकीतील तरुणीला घरी सोडल्याचा कारणावरून(Vadgaon Maval) चौघांनी मिळून संबंधित तरुणाला मारहाण केली आणि त्याच्या चुलत भावावर गोळीबार केला. ही घटना सोमवारी (8 सप्टेंबर) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास एकवीरा चौक, केशवनगर वडगाव येथे घडली.
अक्षय एकनाथ मोहिते (28, वडगाव मावळ) यांनी याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सौरभ रोहिदास वाघमारे (खेड), अभिजित राजाराम ओव्हाळ, रणजीत बाळासाहेब ओव्हाळ (सांगवी, मावळ), प्रथमेश दिवे (तळेगाव दाभाडे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune : पादचारी पूल उभारणीसाठी भिडे पूल आज मध्यरात्रीपासून बंद
Rashi Bhavishya 10 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
अक्षय यांचा चुलत भाऊ दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. त्याने अभिजीत व रणजीत यांच्या भावकीतील मुलीला सोमवारी दुपारी शाळेतून घरी सोडले. त्याच दिवशी सायंकाळी अक्षय यांच्या चुलत भावाला आरोपींनी जबरदस्तीने कार मध्ये बसवून मारहाण केली होती. त्यानंतर अक्षय हे केशवनगर येथील एकवीरा चौकात बसले असताना आरोपी तिथे आले. त्यांनी अक्षय यांना शिवीगाळ केली. पिस्तूल काढून गोळीबार केला. पहिला राऊंड फायर झाला नाही. त्यामुळे आरोपींनी दुसरा राऊंड फायर केला. घाबरलेले अक्षय आणि त्यांचे मित्र जवळच्या सोसायटी मध्ये लपून बसले. गोळीबार केल्यानंतर आरोपी पळून गेले.