मावळ ऑनलाईन – वडगाव-पैसाफंड साखळी रस्त्याचे काम मागील वर्षी करण्यात आले. मात्र कामाच्या निकृष्ठ गुणवत्तेमुळे या रस्त्यांवर अवघ्या काही दिवसांत खड्डे पडले. पावसाळ्यात या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. प्रशासनाचा निषेध करण्यासाठी मनसेचे रुपेश म्हाळसकर आणि माजी उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. वडगाव ते पैसाफंड साखळी रस्त्याचे श्राद्ध घालण्यात आले. संबंधित ठेकेदाराने चार ते पाच वेळेला रस्त्याची डागडुजी केली मात्र रस्त्याची गुणवत्ता सुधारलेली नाही. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून किमान चालण्यायोग्य तरी रस्ता करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी माजी सभापती पंचायत समिती गुलाबराव म्हाळस्कर, वडगाव शहर भाजपाचे अध्यक्ष संभाजी म्हाळस्कर, माजी नगरसेवक रविंद्र म्हाळस्कर,विश्वस्त सचिव पोटोबा देवस्थान अनंता कुडे, माजी नगरसेवक किरण म्हाळस्कर, पुणे जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल रा.कॉं. श.प.गट अतुल राऊत, मावळ युवक अध्यक्ष रा.कॉं.श.प.गट विशाल वहिले,उद्योजक सुनिल शिंदे, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर वाघमारे,प्रसिद्धीप्रमुख मावळ मनसे तानाजी तोडकर,अध्यक्ष वडगाव शहर मनसे मच्छिंद्र मोहिते,उपाध्यक्ष वडगाव शहर मनसे संतोष म्हाळस्कर,अध्यक्ष तळेगाव शहर मनसे सुरज भेगडे, युवती अध्यक्ष महिला आघाडी भाजपा राणीताई म्हाळस्कर, प्रभाग १६ नागरीक राधा कारंडे, अध्यक्ष नानोली गाव मनसे महेंद्र शिंदे,अध्यक्ष मावळ गर्जना गणेशोत्सव मंडळ शुभम म्हाळस्कर,उद्योजक गणेश पंडीत ढोरे,शिवसेना शहर अध्यक्ष वडगाव प्रविण ढोरे, उद्योजक गणेश भांगरे आदी उपस्थित होते.
Jadhavwadi: कंपनीतील साहित्याची चोरी; दोघांना अटक
Khalumbre:कामावर जाण्यास उशीर झाल्याने लिफ्ट मागितली अन घात झाला; कंटेनर खाली चिरडून दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू
दिलेल्या निवेदन म्हटले आहे की,
वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक -१६ मधील खंडोबा मंदिर ते MIDC रोड पर्यंतच्या रस्त्याची पावसामुळे मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून रस्त्याचे डांबरीकरण हे निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे जवळपास निम्म्या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडलेले असून रस्त्याची अक्षरश: चाळणी झाल्याचे निदर्शनास येते. वाहनचालकास वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागते. तसेच पायी चालणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन पुढे चालावे लागते.त्यामुळे या रस्त्यावर नियमित अपघात होत असल्याचे म्हटले आहे.
या रस्त्याने विद्यार्थी,महिला, कामगार, शेतकरी, जेष्ठ नागरिक यांची कायम वर्दळ असते. त्यांना चालताना खूप त्रास सहन करावा लागत असून त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. मागील तीन वर्षांपासून दरवर्षी सदर रस्त्याची संबंधित ठेकेदाराकडून चार ते पाच वेळा तात्पुरत्या स्वरुपाची डागडूजी करण्यात आली परंतु ती सुद्धा पूर्णत: अपुरी आणि निकृष्ट दर्जाची झाली आहे, यामुळे रस्त्यावर पुन्हा मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यात खड्डा आहे कि खड्ड्यात रस्ता आहे हेच समजत नाही.
या पत्राची त्वरित दखल घेऊन सदर रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करुन हा संपूर्ण रस्ता नागरीकांस किमान चालण्यायोग्य तरी करून द्यावा.तसेच जनसेवेसाठी सहकार्य व्हावे, व याबाबत आपण दखल घ्यावी अशी विनंती देखील माजी उपनगराध्यक्ष सायली म्हाळसकर यांनी निवेदनात केलेली आहे.
सोमवार (दि १४) रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता खंडोबा मंदीर ते MIDC रोड या रस्त्याच्या संदर्भात विधिवत श्राध्द आंदोलन सायली म्हाळस्कर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या कार्यक्रमास वडगाव शहर तसेच प्रभाग क्रमांक १६-मधील नागरीक बंधू-भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन रुपेश म्हाळस्कर यांनी केले.


आंदोलना दरम्यान करण्यात आलेल्या मागण्या
१) वडगाव पैसाफंड साखळी रस्ता त्वरीत डागडुजी करून पावसाळ्यानंतर तो पूर्ण डांबरीकरण करणे.
२) साखळी रस्ता ते साईसृष्टी सोसायटी मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ते डागडुजी करणे.
३) खंडोबा मंदिर ते MIDC रोड पर्यंत पथदिवे लावणे.
४) वायकर चाळ येथील अरुंद रस्ता त्वरित रुंद करण्यात यावा.
५) नागरी वस्ती असणाऱ्या ठिकाणी गतिरोधक बसविणे.
६) निवेदेतील अटी व शर्तीनुसार दंडात्मक कारवाई करून नागरिकांना गैरसोय निर्माण केल्याबद्दल योग्य तो गुन्हा दाखल करून संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत त्वरीत समाविष्ट करणे.