मावळ ऑनलाईन – वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या आवारात काही बेवारस( Vadgaon Maval Police) वाहने पडून असून, या वाहनांच्या मूळ मालकांनी सात दिवसांच्या आत आपली वाहने घेऊन जावीत. अन्यथा त्यांचा लिलाव करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिली आहे.
पोलीस ठाण्याच्या परिसरात चार ऑइल वाहतुकीचे ट्रक (टँकर) पडून आहेत. मात्र या वाहनांचे क्रमांक व चॅसिस क्रमांक स्पष्ट दिसून येत नसल्याने त्यांच्या मालकांची ओळख ( Vadgaon Maval Police) पटलेली नाही. सध्या या बेवारस वाहनांची मुद्देमाल निर्गती मोहिमेअंतर्गत विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Wanwadi Crime News : घरगुती गॅस सिलिंडरमध्ये अवैधरित्या गॅस भरणाऱ्या दोघांना वानवडी पोलिसांची धरपकड
सदर वाहनांच्या मालकांनी सात दिवसांच्या आत आपल्या वाहनाची ओळख पटवून आवश्यक कागदपत्रांसह (मूळ आर.सी. बुक व आधारकार्ड) वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम किंवा मुद्देमाल कारकून पोलीस हवालदार संदीप बंडाळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Vadgaon Maval News : वारकरी संप्रदायातील कार्यकर्ते विजय वाघमारे यांचे निधन
अन्यथा आपण आपल्या वाहनाचा ताबा घेण्यास इच्छुक नाही, असे गृहीत धरून या वाहनांबाबत कायदेशीर कारवाई करून लिलाव करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक कदम ( Vadgaon Maval Police) यांनी दिला आहे.