मावळ ऑनलाईन – वडगाव येथे लहान मोठी सुमारे ३० सार्वजनिक गणेश मंडळे ( Vadgaon Maval News) असून यावर्षी बहुतेक मंडळांनी देखावे टाळून सजावटीवर भर दिला आहे .काही मंडळांनी महिला व मुलांसाठी विविध स्पर्धा आरोग्य, नेत्रतपासणी, रक्तदान शिबिर गरजू विद्यार्थ्यांना मदत असे विविध सामाजिक उपक्रम ही राबविले आहेत.
Kharadi Crime News : विवाहाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार; धमकावून दोन लाख रुपये उकळले
वडगाव मावळ येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर देवस्थान ट्रस्ट व ( Vadgaon Maval News) गणेशोत्सव समितीने गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली असून दररोज भजन,धार्मिक उपक्रमासह नेत्रतपासणी शिबीर घेतले आहे. उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र म्हाळसकर आहेत. देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त मंडळाने संयोजन केले आहे.जय बजरंग तालीम मंडळाने तालमीमध्ये श्री प्रतिष्ठापना केली आहे. मंडळाचे हे ७५ वे वर्ष आहे. मुकुंद वाळुंज अध्यक्ष आहेत.
चांदणी चौकातील साईनाथ तरुण मंडळांचे ५२ वे वर्ष आहे. यंदा आकर्षक सजावट करण्यात आली आहे. कानिफनाथ सुपेकर अध्यक्ष आहेत. कुंभारवाडा येथील गणेश तरुण मंडळाचे ५७ वे वर्षे असून यंदा कृत्रिम फुलांची आकर्षक सजावट केली आहे. मंगेश ढोरे अध्यक्ष आहेत.
Kharadi Crime News : विवाहाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार; धमकावून दोन लाख रुपये उकळले
शिवाजी चौकातील जय जवान जय किसान मित्र मंडळाचे ५० वे वर्षे ( Vadgaon Maval News) असून केदारनाथ मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. आरोग्य व दंतचिकित्सा शिबिर, किर्तन, महिलांसाठी लकी ड्रॉ, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान असे विविध सामाजिक कार्यक्रम घेतले आहेत. गणेश वहिले अध्यक्ष आहेत.

ढोरेवाडा येथील सिद्धिविनायक मित्र मंडळाचे ४१ वर्षे असून फुलांची आकर्षक सजावट केली आहे. अतुल प्रकाश ढोरे अध्यक्ष आहेत. मोरया मित्र मंडळाचे हे ३२ वे वर्ष असून यंदा आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. वैभव वाडेकर अध्यक्ष आहेत.

मधुबन कॉलनीतील श्रीराम मित्र मंडळाचे ४६ वे वर्ष असून सजावट केली आहे. रोहित धडवले अध्यक्ष आहेत. कुडेवाडा येथील कानिफनाथ मित्र मंडळाचे ४८ वर्ष असून यंदा कृत्रिम फुलांची आकर्षक सजावट केली आहे. रोहन कुडे अध्यक्ष आहेत. पाटील वाडा येथील अष्टविनायक मित्र मंडळाचे ४८ वर्ष असून यंदा साई दर्शनाचा देखावा सादर केला आहे. नवनाथ गाडेकर अध्यक्ष आहेत.
ढोरेवाडा येथील आदर्श मित्र मंडळाचेही ४६ वे वर्ष असून श्रीकांत चांदेकर ( Vadgaon Maval News) अध्यक्ष आहेत. चावडी चौकातील जयहिंद मित्र मंडळाचे ४५वे वर्षे असून मार्कंडेयाची शिवभक्ती हा पौराणिक देखावा सादर केला आहे. प्रशांत चव्हाण अध्यक्ष आहेत.

खंडोबा चौकातील जय मल्हार ग्रुपचे १७ वर्षे असून स्वामी ( Vadgaon Maval News) समर्थांचा देखावा सादर केला आहे. रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. सौरभ सावले अध्यक्ष आहेत. पंचमुखी मारुती मित्र मंडळाचे २९ वे वर्षे असून सजावट केली आहे. मंदार जाधव अध्यक्ष आहेत. बवरे वाडा येथील बाल विकास मित्र मंडळाचे ५१ वर्ष असून आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. प्रसाद देवघरे अध्यक्ष आहेत.
म्हाळसकर वाडा येथील नवचैतन्य तरुण मंडळाचे ५१ वर्ष असून ( Vadgaon Maval News) आकर्षक सजावट केली आहे संतोष म्हाळसकर अध्यक्ष आहेत. टेल्को कॉलनीतील योगेश्वर प्रतिष्ठानचे ३५ वे वर्ष असून सजावट केले आहे. प्रवीण पवार अध्यक्ष आहेत.बाजारपेठेतील ओंकार मित्र मंडळाचे ४१वे वर्ष आहे सजावट केली आहे. दिनेश प्रजापती अध्यक्ष आहेत. क्रांती मित्र मंडळाचे ५४ वे वर्ष असून फुलांची सजावट केली आहे. दर्शन वाळुंज अध्यक्ष आहेत. इंद्रायणी नगरमधील इंद्रायणी मित्र मंडळाचे ३९ वे वर्ष असून कृत्रिम फुलांची आकर्षक सजावट केली आहे अखिलेश तुमकर अध्यक्ष आहेत.

माळीनगर येथील माळीनगर मित्रमंडळाचे हे ३४वे वर्षे असून सजावट केली आहे. सागर आलम अध्यक्ष आहेत. दिग्विजय मित्र मंडळाचे हे २७वे वर्ष असून सजावट केली आहे. नेत्र तपासणी, रक्तदान शिबिर, महिलांसाठी डिजिटल साक्षरता अभियान आदी उपक्रम घेतले आहेत. श्रीधर भेगडे अध्यक्ष आहेत. पंचशील मित्र मंडळाचे ४१वे वर्ष असून कृत्रिम फुलांची आकर्षक सजावट ( Vadgaon Maval News) केली आहे. गणेश हिंगे अध्यक्ष आहेत.

शिवशंभू मित्र मंडळाचे हे २९ वे वर्ष असून आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. गणेश भिलारे अध्यक्ष आहेत. विजय नगर मित्र मंडळाचे हे ३९ वे वर्षे असून आकर्षक सजावट केली आहे. जिगर सोलंकी अध्यक्ष आहेत. मयुरेश्वर कॉलनीतील नव मयुरेश्वर मित्र मंडळाने यंदा विधायक उपक्रमावर भर दिला आहे. अथर्व वाघमारे अध्यक्ष आहेत. केशवनगर मधील शितळादेवी मित्र मंडळाचे हे २२ वे वर्षे असून आकर्षक सजावट केली आहे. दिनेश शिंदे अध्यक्ष आहेत.
वक्रतुंड मित्र मंडळाचे ११ वे वर्षे असून अष्टविनायक दर्शन देखावा सादर केला आहे, नवनाथ नरूटे अध्यक्ष आहेत याशिवाय भैरवनाथ मित्र मंडळ, एकविरा मित्र मंडळ, महालक्ष्मी मित्र मंडळ, शिवाजी मित्र मंडळ, स्वराज्य मित्र मंडळ, झोटिंग बाबा मित्र मंडळ आदी मंडळांनी ही सजावटीवर भर देऊन सामाजिक उपक्रम राबवले ( Vadgaon Maval News) आहेत.