situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Vadgaon Maval News :विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त;शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सज्ज

Published On:
Vadgaon Maval News

मावळ ऑनलाईन – आज ( दि. २ सप्टेंबर) वडगाव मावळ ( Vadgaon Maval News) येथील विसर्जन मिरवणुकीसाठी वडगाव मावळ पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. मिरवणुकीसाठी ज्यादा पोलिसांची कुमक वाढविण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिली असून शांतता व सुव्यवस्था राखत गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन सांगता पूर्ण करावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

Rashi Bhavishya 2 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

वडगाव मावळ येथे सुमारे ३० प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे( Vadgaon Maval News) आहेत. यामध्ये ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थान गणपती मंडळ,जय बजरंग तालीम मंडळ हे मानाचे गणपती नंतर बालविकास मित्र मंडळ,गणेश तरुण मंडळ, सिद्धिविनायक मित्र मंडळ,मोरया मित्र मंडळ,जय जवान जय किसान मित्र मंडळ, जय मल्हार ग्रुप,कानिफनाथ तरुण मंडळ, अष्टविनायक मित्रमंडळ,साईनाथ तरुण मंडळ, नवचैतन्य तरुण मंडळ, श्रीराम मित्रमंडळ,जयहिंद तरुण मंडळ, आदर्श तरुण मंडळ,क्रांती मित्र मंडळ,ओंकार मित्र मंडळ, योगेश्वर प्रतिष्ठान,पंचमुखी मित्र मंडळ, विजयनगर मित्र मंडळ, दिग्विजय मित्र मंडळ,माळीनगर मित्र मंडळ,शिवशंभो तरुण मंडळ, इंद्रायणी तरुण मंडळ,शितळादेवी, मित्र मंडळ वक्रतुंड मित्र मंडळ, भैरवनाथ मित्र मंडळ,एकवीरा मित्र मंडळ आदी मंडळे आहेत.

Devendra Fadnavis: सिंहगड रस्त्यावर पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करून वाहतुकीसाठी झाला खुला

या सर्व मंडळांनी आपापले रथ सजविले असून फुलांची सजावट ( Vadgaon Maval News) केली आहे त्याचबरोबर विद्युत रोषणाई केली असून रथापुढे ढोल पथक, भजनी मंडळे आदि नियोजन केले आहे. या विसर्जन मिरवणुकीमध्ये विसर्जन मार्गावर विविध ठिकाणी मंडळांच्या स्वागतासाठी स्वागत कमानी उभारलेल्या आहेत.

यंदाची विसर्जन मिरवणूक डीजे मुक्त व प्रदूषण मुक्त होणार असून शांततामय व सुव्यवस्थितपणे संपन्न होणार असल्याचेही पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी सांगितले आहे.

विसर्जन मिरवणुकीसाठी कडक बंदोबस्त ठेवला असून विशेष पथकामध्ये पी आय,दोन पीएसआय,पोलीस अंमलदार, होमगार्ड मिळून ५० जण असणार ( Vadgaon Maval News) आहेत.

विसर्जन मिरवणुकीचा मार्ग

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्री पोटोबा महाराज मंदिर देवस्थान पर्यंत असणार आहे.
यंदाची विसर्जन मिरवणूक दुपारी ३:०० वाजता सुरू होऊन वेळेतच विसर्जन सांगता करावी असे आवाहन वडगाव पोलीस यंत्रणेकडून करण्यात आले ( Vadgaon Maval News) आहे.

सात ठिकाणी विसर्जन हौद

शहरात एकूण सात ठिकाणी विसर्जन हौद उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये केशवनगर पाणी टाकीजवळ, विजयनगर कॉलनी, श्री पोटोबा महाराज तलावाजवळ स्मशानभूमी पाठीमागे, माळीनगर, प्रभाग क्रमांक १६ पाणी टाकीजवळ, प्रभाग क्रमांक १७ छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी कृत्रिम विसर्जन हौद व निर्माल्य कलशाची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, भक्तांनी पूजेतून निर्माण झालेली फुले, पत्री, नारळ व इतर पूजासामग्री नदी किंवा विहिरीत न टाकता नगरपंचायतने शहरात उभारलेल्या निर्माल्य कलशांमध्ये जमा करावीत, अशी सूचना प्रशासनाने केली (Vadgaon Maval News) आहे.

Follow Us On