मावळ ऑनलाईन –तळेगाव स्टेशन परिसरातील यशवंतनगर येथून कातवीकडे ( Vadgaon Maval News) जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे, तीव्र उतार, रात्रीच्या वेळी अंधार यामुळे या मार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याने विद्यार्थी आणि महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Taljai Hill Crime News : तळजाई टेकडी परिसरात तरुणावर कोयत्याने हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा
तळेगांव दाभाडे स्टेशन हद्दीपासून यशवंतनगरच्या पुढे कातवी पुलापर्यंत रस्त्याची दुर्दशा झाली असून रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावर पथदिवेच नसल्याने जेष्ठ नागरिकांना आणि महिलांना रात्रीच्या वेळी तर भयंकर परिस्थितीत जीव मुठीत धरून या रस्त्यावर चालणे धोकादायक झाले आहे. पुढे खाई आणि मागे अंधार त्यात अनेक फूट खोल खड्डयातून जाताना वाहने आपटून मुका मार आणि हाडे खिळखिळी होऊन पाठ दुखी, मणक्याचे आजार होतील.
सार्वजनिक बांधकाम खाते आणि लोकप्रिय ( Vadgaon Maval News) आजी, माजी आणि इच्छुक लोकप्रतिनिधी याविषयी रस्ते दुरुस्ती आणि इतर काही कामे करतील का? असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.



















