मावळ ऑनलाईन – इनरव्हील क्लब ऑफ मावळ शक्ती, इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राइड,मायमर मेडिकल कॉलेज ( Vadgaon Maval News) व बी. एस. टी. आर. हॉस्पिटल तळेगाव दाभाडे व ग्रामपंचायत इंदोरी, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यांच्या अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदोरी येथील अंगणवाडी ते चौथीच्या वर्गातील पाचशे मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये प्रामुख्याने एनिमिया, ब्लड ग्रुप, दंतरोग, त्वचारोग, नेत्र तपासणी, हृदयरोग, जंत तपासणी, सर्दी, खोकला, थंडी, ताप आदी तपासणी करण्यात आली.
Rashi Bhavishya 10 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?
कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मान्यवर सहा. गटविकास अधिकारी सेवक थोरात वैद्यकीय अधीक्षक दर्पण महेशगौरी, ग्रामविकास अधिकारी अरुण हुलगे, इंदोरी सरपंच शशिकांत शिंदे, इनरव्हील क्लब मावळ शक्तीचे अध्यक्षा ज्योती राजिवडे, क्लब निगडी प्राइडच्या अध्यक्षा डॉ. कमलजीत कौर दुल्लत.शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल चव्हाण हे प्रमुख मान्यवर उपस्थित ( Vadgaon Maval News) होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मावळ शक्ती क्लबच्या एडिटर छाया साळुंके यांनी केले व कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवक थोरात यांनी आरोग्य तपासणी करिता काही मदत लागली तर नेहमी शासन आपल्या सोबत राहील याची ग्वाही ( Vadgaon Maval News) दिली.
City Post : सिटी पोस्टच्या सेवेला शंभर वर्षे झाल्यानिमित्त पोस्टमनचा विशेष सन्मान
सरपंच शशिकांत शिंदे यांनी वैद्यकीय तपासणीसाठी काही मदत लागली तर आम्ही सर्वतोपयोगी मदत करू असे सांगितले.वैद्यकीय अधीक्षक दर्पण महेश गौरी स्वतः आरोग्य तपासणीच्या वेळेस सर्वां विद्यार्थ्यांची चौकशी ( Vadgaon Maval News) करून काही प्रॉब्लेम असल्यास पुढच्या उपचारासाठी दवाखान्यांमध्ये आपण करू असं आश्वासन दिले.

आभार क्लबच्या सेक्रेटरी सुरैय्या शेख यांनी मानले. खजिनदार राजश्री नाईकरे, एक्झिटिव्ह मेंबर रेखा बरीदे, एक्झिटिव्ह मेंबर मोहिनी काळे, एक्झिटिव्ह मेंबर कु.अश्विनी बेंद्रे, एक्झिटिव्ह मेंबर वैशाली लागाडे,जयश्री सावंत,भरत राजीवडे,पुष्पाताई घोजगे, पुनम पुनवटकर, डॉ.अमिता. विस्तार अधिकारी सरोजिनी गावडे, हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स, ग्रामपंचाय सदस्य व कर्मचारी, शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. मुलांची तपासणी झाल्यानंतर मुलांना खाऊ देऊन कार्यक्रमाचे सांगता करण्यात ( Vadgaon Maval News) आली.