मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आज पुन्हा झालेल्या सोडतीमध्ये किरकोळ बदल वगळता बहुतांश ( Vadgaon Maval )आरक्षणे कायम राहिली असून राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या कान्हे, जांभूळ, नाणे, आंबी या ग्रामपंचायतींचे सरपंच पद विविध घटकांसाठी आरक्षित झाले असल्याने खुल्या वर्गातील इच्छुकांचा हिरमोड झाला आहे तर नवलाख उंबरे, कार्ला, बेबडओहोळ, माळवाडी, वाकसाई या मोठ्या ग्रामपंचायतींचे सरपंच पद सर्वसाधारण साठी खुले राहिल्याने इच्छुकांच्या आशा बळावल्या आहेत.
तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी पाच वर्षासाठी मावळ मधील १०३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठीची सोडत वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स मंगल कार्यालयात शुक्रवार (दि११) काढण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार गणेश तळेकर, महसूल नायब तहसीलदार अविनाश पिसाळ, मंडल अधिकारी माणिक साबळे आदी उपस्थित होते.
Kalapini : कलापिनी व समर्थ सेवा मंडळातर्फे ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेचे आयोजन
यावेळी मावळ तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतींपैकी आदिवासी क्षेत्रातील १० ग्रामपंचायती अनुसूचित जाती जमातीसाठी कायमस्वरूपी राखीव असल्याने त्यांचा या सोडतीमध्ये समावेश केला नाही. उर्वरित ९३ ग्रामपंचायतीपैकी नऊ ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी, सहा ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी, २५ ग्रामपंचायती नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) तर ५३ ग्रामपंचायती सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या. सर्वसाधारण ५३ ग्रामपंचायतींमधून महिला व पुरुषांसाठी आरक्षण ( Vadgaon Maval )काढण्यात आल्या.
MLA Mahesh Landge : दारुबंदी विधेयक सुधारणेसाठी सभागृहात खडाजंगी!
आरक्षण व ग्रामपंचायतचे नाव पुढीलप्रमाणे :
………………………….
अनुसूचित जमाती (अनुसूचित क्षेत्र) – शिरदे, कुणे नामा, सावळा, वडेश्वर, माळेगाव बुद्रुक,
अनुसूचित जमाती स्त्री (अनुसूचित क्षेत्र)- कुसवली, उडेवाडी, खांड, कशाळ, इंगळूण,
………………………
अनुसूचित जाती – आंबी, कुसगाव पमा, नाणे, आढले बुद्रुक.
अनुसूचित जातीसाठी स्री – तुंग, कान्हे, ओवळे, शिळीम, शिवणे,
अनुसूचित जमाती – डोंगरगाव, मळवंडी ठुले, देवले.
अनुसूचित जमाती स्त्री – करूंज, जांभूळ, जांबवडे( Vadgaon Maval )
………………………………
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री – सोमाटणे, कुरवंडे, खडकाळा, मोरवे, शिरगाव, वारू, पुसाणे, औंढे खुर्द, बऊर, उर्से, मळवंडी ढोरे, येलघोल, धामणे.
………………………………….
नागरिकांचा मागास प्रवर्ग – शिळाटणे, वराळे, सांगिसे, वरसोली, पाटण, मळवली, करंजगाव, दारुंब्रे, भाजे, खांडशी, सांगावडे, कांब्रे नामा.( Vadgaon Maval )
………………………………
सर्वसाधारण स्त्री – केवरे, काले, टाकवे खुर्द, नानोली तर्फे चाकण, ओझर्डे, कोथुर्णे, सुदुंबरे साळुंब्रे, सुदवडी, दिवड, चिखलसे, गहुंजे, कल्हाट, साते, आढले खुर्द, डोणे, इंदुरी, डाहुली, निगडे, टाकवे बुद्रुक, थूगाव, शिवली, गोवित्री, कुसगाव खुर्द, महागाव, घोणशेत, अजिवली.
………………………………..
………………………
सर्वसाधारण – कडधे, ठाकूरसाई, पाचाणे, लोहगड, आंबळे, नवलाख उंबरे, वेहेरगाव, ताजे, कार्ला, तिकोना, साई, परंदवडी, कुसगाव बुद्रुक, आपटी, चांदखेड, भोयरे, गोडुंब्रे, येळसे, बेबडओहोळ, कोंडीवडे अमा, माळवाडी, वाकसई, मुंढावरे, आढे, उकसान, आंबेगाव ( Vadgaon Maval )