मावळ ऑनलाईन –शिक्षण, उद्योग, सहकार,आरोग्य क्षेत्रातील जाणते (Vadgaon Maval)व्यक्तिमत्व मावळभूषण माजी आमदार कृष्णराव भेगडे यांची ९० वी जयंती कौटुंबिक स्तरावर साजरी करण्यात आली. याप्रसंगी भेगडे यांच्या कार्याला व स्मृतींना अभिवादन करण्यासाठी माजी मंत्री व नुमविप्र मंडळाचे अध्यक्ष संजय तथा बाळा भेगडे, ज्येष्ठ उद्योजक व इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे,अशोकराव शेलार, नंदकुमार शेलार, आनंद भेगडे, किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश भेगडे, उद्योजक व कृष्णराव भेगडे यांचे जावई राजेश म्हस्के, कन्या राजश्री म्हस्के, नाती रिद्धी व रवीना म्हस्के, तसेच संजय गाडे पाटील,प्रशांत भागवत,दादासाहेब उऱ्हे,मनोज ढमाले,अशोक काकडे, सुहास गरूड, संदीप काकडे, शांताराम कराळे, समीर कोयते, दामू चोरघे आणि मावळ तालुक्याच्या विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी सहभागी झाले होते.
याप्रसंगी मान्यवरांनी कृष्णराव भेगडे यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी बोलताना मंत्री बाळा भेगडे म्हणाले की, राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजाकडे समग्र दृष्टीने बघण्याचे कसब भेगडे साहेबांना अवगत होते. म्हणूनच मावळ तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यात त्यांना यश आले. याप्रसंगी बोलताना गणेश खांडगे म्हणाले की, आज साहेब नसताना त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना अंत:करण भरून येत आहे. साहेबांच्या विचारांवर आपली पुढची वाटचाल करणे हे आपले कर्तव्य असून साहेबांचे विचार अजरामर ठेवणे ही या पुढील पिढ्यांची जबाबदारी आहे असे मत खांडगे यांनी व्यक्त केले.यावेळी डॉ दत्तात्रय गोपाळघरे यांनीही मनोगत व्यक्त करून अभिवादन केले.
Pune: पुणे ते कोकण रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी कोकण विकास महासंघाचा मागणीपत्र सादर
Golden Rotary: गोल्डन रोटरीचा आगळावेगळा रक्षाबंधन उत्सव

पुढील वर्षभर मावळ तालुक्यामध्ये विविध शैक्षणिक, आरोग्य विषयक विविध उपक्रम राबवून कृष्णराव भेगडे यांच्या स्मृती चिरंतन जतन करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.