situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Vadgaon Maval: उर्से खिंडीत गणेश मूर्ती आढळल्याने गणेशभक्तांमध्ये रोष; प्रशासनाकडून असा कुठलाही प्रकार नसल्याचा दावा

Updated On:

मावळ ऑनलाईन – वडगाव मावळ नगरपंचायतच्या अखत्यारीत (Vadgaon Maval)येणाऱ्या उर्से खिंडीत (मल्हारगड) विसर्जनानंतर रस्त्याच्या बाजूला गणेश मूर्ती आढळून आल्याने खळबळ उडाली. याबाबत वडगाव नगरपंचायत प्रशासनाने स्थळ पाहणी केली असता तिथे तशा कोणत्याही मूर्ती नसल्याचे प्रशासनाने सांगितले. दरम्यान, अशा प्रकारे कुणीही धार्मिक भावना दुखावतील असे वर्तन न करण्याचे आवाहन नगर पंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.

गणेश विसर्जन झाल्यानंतर उर्से खिंडीत रस्त्याच्या बाजूला गणेश मूर्ती आढळल्याचे काही गणेश भक्तांच्या निदर्शनास आले. तसेच या मुर्त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. संतप्त नागरिकांनी याबाबत प्रशासनावर रोष व्यक्त केला. तात्काळ विधिवत विसर्जन करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली.

नगरपंचायतने गणेशोत्सव कालावधीत २८५० मुर्त्यांची संकलन केले. मूर्ती संकलनासाठी आठ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. नागरिकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. सर्व मंडळांनी कृत्रिम हौदात विसर्जन केले. वडगाव शहरात यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर अशा प्रकारे मुर्त्या रस्त्याच्या बाजूला ठेवल्याचा प्रकार समोर आल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला.

याबाबत बोलताना वडगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम म्हणाले, गणेश विसर्जन करताना वडगाव मावळ नगरपंचायतने गणेश मूर्ती संकलनाचा उपक्रम राबवला. यामध्ये नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. नगरपंचायतकडे जमा झालेल्या मुर्त्यांचे विधिवत विसर्जन करण्यात आले. जे फोटो व्हायरल होत आहेत, तिथल्या ठिकाणाची पाहणी करण्यात आली आहे. काही असेल तर माहिती घेतली जाईल. विसर्जनानंतर गणेश मूर्तींचे फोटो व्हायरल केल्यास संबंधितांवर कारवाई होऊ शकते. असे फोटो व्हायरल केल्यास विटंबना होते. नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावू नये. काही माहिती असेल तर प्रशासनाला कळवावे त्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल.

रुपेश म्हाळसकर (मनसे) –

ज्या ठेकेदाराला वडगाव नगर पंचायतीने गणेशमूर्तींचे व्यवस्थापन करण्याचे कंत्राट दिले होते, त्या ठेकेदाराने मूर्तींचे विधीवत विसर्जन न करता, नागरिकांच्या भावना दुखावतील अशा पद्धतीने त्या कचऱ्यात फेकल्या आहेत. आम्ही स्वतः स्थळ पाहणी केली असून मूर्ती गाडलेल्या आढळून आल्या आहेत. संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी आहे, अन्यथा आम्ही नगर पंचायतीवर मोर्चा काढू.

Bapusaheb Bhonde Highschool : ॲड बापूसाहेब भोंडे हायस्कूलमध्ये राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा

Chinchwad: एका फोनवर सुटणार चिंचवडमधील नागरिकांच्या समस्या ;आमदार शंकर जगताप यांची वन कॉल प्रोब्लेम सोल्व्ह हेल्पलाईन नागरिकांच्या सेवेत

विशाल वहिले (माजी उपसरपंच वडगाव ग्रामपंचायत) –

नगर पंचायत प्रशासनाने या घटनेची चौकशी करावी. दोषी ठेकेदारावर कारवाई करावी, गुन्हा दाखल करावा. नागरिकांच्या धार्मिक भावना यामुळे दुखावल्या गेल्या आहेत. तसेच, सध्या तिथे असलेल्या गणेश मूर्तींचे व्यवस्थापन तथा विसर्जन करण्याची परवानगी प्रशासनाने आम्हाला द्यावी. आम्ही जय मल्हार ग्रुपकडून गणेश मूर्तींचे शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन करू.

Follow Us On