मावळ ऑनलाईन – रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मावळ विचार मंच यांच्या वतीने अटल आरोग्य अभियानांतर्गत डायलिसिस सुविधेचे रविवार दि.१५ जून रोजी लोकार्पण (Vadgaon Maval)करण्यात येणार आहे.
आर के लुंकड उद्योगसमूहाचे चेअरमन रमणलाल लुंकड यांच्या सहयोगातून विघ्नहर्ता हॉस्पिटल वडगाव येथे ही सुविधा उपलब्ध होणार (Vadgaon Maval) आहे.
Crime News : रस्ता बंद असल्याचे सांगितल्याने एकास मारहाण
वडगाव शहरातील डायलिसिस उपचार घेणाऱ्या रुग्णांना शहरापासून दूर जावे लागते,अधिक पैसे खर्च होतात.रुग्णासह सोबत असलेल्या नातेवाईकांच्या वेळेचा अपव्यय होतो.या सर्व गैरसोयी लक्षात घेऊन मावळ विचार मंच संस्थेच्या वतीने रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आर के लुंकड उद्योगसमूहाच्या सहयोगातून व माजी नगरसेवक भूषण मुथा यांच्या प्रयत्नातून मोफत डायलिसिस सुविधा (Vadgaon Maval) उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Pimpri Chichwad Crime News 13 June 2025 : हिंजवडी येथे दोघांवर चाकूने वार
रविवार दि.१५ जून २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता वडगाव मधील विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे या सुविधेचा उद्घाटन समारंभ होणार असून कार्यक्रमासाठी उद्योजक रमणलाल लुंकड ,जैन आर्थिक विकास महामंडळाचे ललितजी गांधी,माजी राज्यमंत्री बाळा भेगडे,तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्यासह किरण बोरा, रविंद्र लुंकड, संदीप भंडारी, प्रविण निकम,आनंद छाजेड, सुनिल देसरडा,विजय मरलेचा, सुभाषचंद्र मुथा, शिवाजी पालवे,पद्मराज जाधवर, निलेश जाधवर, मोतीराम जाधवर, ज्ञानदेव पाटील,दिलीप उकिरडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.मावळ विचार मंचाचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.अशी माहीती मावळ विचार मंच कार्यकारिणी चे प्रमुख गुलाबराव म्हाळसकर यांनी दिली.मावळ विचार मंच संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असल्याचेही त्यांनी (Vadgaon Maval) सांगितले.