मावळ ऑनलाईन – वडगाव मावळ न्यायालयाच्या अत्याधुनिक (Vadgaon Maval Court) इमारतीच्या कामास अखेर मंजुरी मिळाली असून या निर्णयामुळे वकिलांमध्ये व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दीर्घ काळापासून न्यायालयाच्या सोयीसुविधा (Vadgaon Maval Court) वाढवण्याची मागणी होत होती. न्यायप्रक्रिया अधिक वेगवान व परिणामकारक करण्यासाठी तसेच वकिलांना, न्यायप्रेमी नागरिकांना सुसज्ज सुविधा मिळाव्यात यासाठी या नव्या इमारतीचे काम अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
Pimpri Chinchwad Crime News 26 August 2025 : भागीदारी व्यवसायात ८० लाखांचा गंडा
या मंजुरीसाठी वडगाव मावळ बार असोसिएशनने सातत्यपूर्ण (Vadgaon Maval Court) प्रयत्न केले.अध्यक्ष ॲड. प्रताप शेलार, उपाध्यक्ष ॲड. शैलेश पडवळ, सचिव ॲड. अमोल दाभाडे, ॲड हर्षद देशमुख,ॲड आकाश ढोरे, सदस्य व कार्यकारिणी यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांना माजी अध्यक्ष ॲड. रविंद्र दाभाडे, ॲड अशोक ढोरे,ॲड.राजेंद्र गाडे पाटील, ॲड. निलीमा खिरे, ॲड. संजय वांद्रे, ॲड. यशवंत गोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच सर्व सहकारी वकिलांचा पाठिंबा आणि जेष्ठ वकिलांचे मार्गदर्शनही या प्रक्रियेत महत्त्वाचे ठरले.
अध्यक्ष ॲड.प्रताप शेलार यांनी भावना व्यक्त करताना (Vadgaon Maval Court) सांगितले की, “न्यायालयाच्या अत्याधुनिक इमारतीची आवश्यकता गेली अनेक वर्षे भासत होती. अखेर या कामाला मंजुरी मिळाल्याने वडगाव मावळ न्यायप्रक्रियेचा नवा अध्याय सुरू होईल. यामध्ये सर्व वकिलांचे योगदान आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे आहे.”
उपाध्यक्ष ॲड. शैलेश पडवळ यांनी सांगितले की, “या इमारतीमुळे न्यायप्रक्रिया अधिक गतीमान होईल. न्यायालयीन कामकाज सुलभ करण्यासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. हे यश हे केवळ आमचे नसून संपूर्ण वकिल बांधवांचे (Vadgaon Maval Court) आहे.”
Vijayrao Kalokhe : तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी विजयराव काळोखे
नव्या इमारतीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा, न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यक सोयी, वकिलांसाठी कार्यक्षम कार्यालयीन व्यवस्था यांचा समावेश असणार आहे. यामुळे प्रलंबित खटले जलदगतीने निकाली काढणे सोपे होईल, असा विश्वास व्यक्त केला जात (Vadgaon Maval Court) आहे.