मावळ ऑनलाईन – वडगाव मावळ न्यायालयाच्या अत्याधुनिक इमारतीच्या (Vadgaon Maval Court) कामास अखेर मंजुरी मिळाली असून या कामासाठी तब्बल १०९ कोटी ८ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे वकिलांबरोबरच न्यायप्रेमी नागरिकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
NIPM : एनआयपीएमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पुण्यातील तीन जणांची निवड
प्रदीर्घकाळापासून वडगाव मावळ येथील न्यायालयीन (Vadgaon Maval Court) सोयीसुविधा अपुऱ्या असल्याने वकिल व पक्षकारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. न्यायप्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ व्हावी, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कामकाज परिणामकारक रीतीने पार पडावे, यासाठी नवीन इमारतीची मागणी सातत्याने होत होती. अखेर शासनाने ही मागणी मान्य करत मंजुरी दिल्याने न्यायालयीन कामकाजाला नवी गती मिळणार आहे.
या इमारतीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा, न्यायालयीन (Vadgaon Maval Court) कामकाजासाठी अत्याधुनिक सभागृह, वकिलांसाठी कार्यक्षम कार्यालयीन व्यवस्था, तसेच नागरिकांसाठी सोयीस्कर सुविधा असणार आहेत. यामुळे प्रलंबित खटल्यांचा निपटारा जलदगतीने होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या मंजुरीसाठी वडगाव मावळ बार असोसिएशनने (Vadgaon Maval Court) सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. याबाबत बोलताना बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रताप शेलार म्हणाले, “न्यायालयाच्या आधुनिक इमारतीची आवश्यकता गेली अनेक वर्षांपासून भासत होती. अखेर मंजुरी मिळाल्याने न्यायप्रक्रियेत नवा अध्याय सुरू होईल. आधुनिक सोयीसुविधांमुळे कामकाज अधिक गतीमान होईल.”
मंजूर निधीमुळे या इमारतीचे काम जलदगतीने पूर्ण होण्याची अपेक्षा असून, न्यायालयीन यंत्रणेला सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय ऐतिहासिक ठरणार (Vadgaon Maval Court) आहे.