मावळ ऑनलाईन –मावळ तालुक्यातील बापूसाहेब भेगडे समर्थक (Vadgaon Maval)सोमवारी (१५ सप्टेंबर) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई येथील पक्ष कार्यालयात हा पक्ष प्रवेश होणार आहे. नेमके कोणकोणते पदाधिकारी प्रवेश करणार याबाबत उत्सुकता आहे. त्यामुळे पुढील राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सर्व समावेशक नेतृत्व आहे, या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मावळ तालुक्यातील बापूसाहेब भेगडे समर्थक सोमवार (दि१५) भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सुभाषराव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Warangwadi News : छाया नखाते यांचे निधन
भाजप पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि १४) वडगाव मावळ येथे सकाळी ११ वा.घेतलेल्या पत्रकार परिषदेत संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सुभाषराव जाधव यांनी ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धनचे माजी सभापती बाबुराव वायकर, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याणचे माजी सभापती अतिश परदेशी, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते किशोर भेगडे,मावळ पंचायत समितीचे माजी गटनेते सचिन घोटकुले, खरेदी विक्री संघाचे सभापती शिवाजी असवले,उद्योजक संतोष मु-हे,माजी सरपंच कैलास खांडभोर उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षात प्रवेश करणारे हे सर्वजण पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते मात्र विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी ह्या गटाने अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचे काम केले होते. तोच गट भाजपात प्रवेश करणार आहे.
मुंबई येथील भारतीय जनता पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश होणार आहे.सोमवारी सकाळी सोमाटणे फाटा येथून भेगडे समर्थक पक्ष प्रवेशासाठी मुंबईला रवाना होणार आहे. नेमके किती भेगडे समर्थक पक्ष प्रवेश करणार आहेत याबाबत उत्सुकता कायम आहे.