situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Vadgaon Maval: मावळ तालुक्यात ५ पक्ष एकत्र — ‘महाविकासआघाडी’ म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार

Published On:

मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी (Vadgaon Maval)मावळ तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) आणि भारतीय जनता पक्ष या दोन पक्षांपुरतीच मर्यादित असलेली राजकीय चर्चा आता अधिक व्यापक झाली आहे. मावळ तालुक्यातील काँग्रेस (आय), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडी हे पाच पक्ष एकत्र येऊन महाविकासआघाडीच्या माध्यमातून एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाणार आहे.

या संदर्भात नुकतीच महाविकासआघाडीच्या घटक पक्षांच्या तालुकाध्यक्षांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली. या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, शिवसेना (उबाठा) चे तालुकाध्यक्ष आशिष ठोंबरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष अशोक कुटे आणि वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष नितीन ओव्हाळ उपस्थित होते.

Anup More : भाजयुमो प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्यासह सात जणांविरुद्ध भाजप महिला पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी गुन्हा

Murder : जमिनीच्या वादातून तरुणाचा गळा चिरुन खून;आरोपींना नानोली भागातून घेतले ताब्यात

या पाचही पक्षांच्या प्रतिनिधींनी एकमताने जाहीर केले की, मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, तळेगाव दाभाडे आणि लोणावळा नगरपरिषदा तसेच वडगाव मावळ नगरपंचायतीच्या निवडणुका ‘महाविकासआघाडी’च्या बॅनरखाली लढवल्या जाणार आहेत.

या प्रसंगी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “लोकशाही टिकविण्यासाठी विरोधकांचा आवाज सशक्त राहणे आवश्यक आहे. मावळात जनतेच्या प्रश्नांवर, विकासावर आणि पारदर्शक कारभारासाठी आम्ही पाचही पक्ष एकत्र येऊन महाविकासआघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवू. मतदारांना एक पर्याय निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचेही पत्रकार परिषदेत सांगितले.

तसेच “आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही, पण जनतेच्या हितासाठी एकविचाराने लढण्याचा आमचा निर्धार आहे. योग्य ठिकाणी सन्मानपूर्वक वाटाघाटी झाल्यास तालुक्यातील काही ठिकाणी बिनविरोध निवडणुकांनाही आम्ही पाठींबा देऊ शकतो.”

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचाली वेगवान

मावळ तालुक्यात येत्या काही दिवसांत पंचायत समिती, जिल्हा परिषद, तसेच तळेगाव दाभाडे, लोणावळा आणि वडगाव मावळ नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडणार आहेत. या सर्व निवडणुकांमध्ये भाजपाने स्वबळावर लढण्याचा निर्धार केला आहे. ते आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज आहे, तर दुसरीकडे महाविकासआघाडीचे हे पाच घटक पक्ष संयुक्त रणनिती आखत आहेत.

आगामी काही दिवसांत या आघाडीचे संयुक्त जाहीरनामा, प्रचार समिती आणि उमेदवार निवड प्रक्रिया जाहीर होणार असल्याचे सुतोवाच केले आहे. महाविकासआघाडीच्या या घडामोडीमुळे मावळ तालुक्यातील राजकीय वातावरण आणखी रंगतदार झाले आहे.

Follow Us On